अहिल्यानगर-लवकरच होणाऱ्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सोमवार दि.१५ डिसेंबर रोजी तारकपूर येथील हॉटेल व्ही स्टार येथे सकाळी ११ वाजल्यापासून होणार आहेत. यासाठी इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज दाखल करणे बंधनकारक आहे. १५ डिसेंबरला सकाळी ११ ते १२ या वेळेत केडगाव भागातील प्रभाग क्र.१५,१६ व १७. दुपारी १२ ते २ या वेळेत सावेडी भागातील प्रभाग क्र.१ ते ४ व ६,७,व ८ तसेच दुपारी ३ ते ५ या वेळेत मध्यनगर मधील प्रभाग क्र. ५ व ९ ते १४ या पद्धतीने इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. इच्छुकांनी एकाचवेळी गर्दी न करता आपल्या प्रभागाच्या वेळेनुसार मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अशी महिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी दिली.
अधिक माहिती देताना सरचिटणीस अशोक गायकवाड यांनी सांगितले, निवडणूक प्रभारी तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. यासाठी सह प्रभारी आ.विक्रमसिंह पाचपुते, माजी खासदार डॉ.सुजय विखे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, महायुतीचे समन्वयक सुनील रामदासी व जिल्हा समन्वयक विनायक देशमुख यांच्या उपस्थितीत या मुलाखती होणार आहेत. राखीव मतदारसंघातील उमेदवारांनी आरक्षणानुसार जात पडताळणी प्रमाणपत्राची झेरॉक्स अर्जासोबत जोडावी.
इच्छुक उमेदवारांना लक्ष्मीकारंजा चौकातील भाजपच्या पक्ष कार्यलयात दि. १३ डिसेंबरला सकाळी १० ते २ व रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत मोफत अर्ज मिळणार आहेत. रविवारी हे अर्ज जमा करून त्या अर्जांची छाननी होणार आहे. प्रत्यक्ष मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवाराने एकट्याने यावे. सोबत कार्यकर्ते अणु नये. मुलाखतीच्या ठिकाणी शक्तिप्रदर्शन करणाऱ्यांची गंभीर दखल घेतली जाईल. इच्छुक उमेदवारांनी अर्जाच्या अधिक माहितीसाठी अविनाश वाणी मोबाईल क्र. ९०२१७३२५३० येथे संपर्क साधावा.


