Thursday, February 19, 2026

नगर शहरात दुरूस्तीसाठी ठेवलेला वर्कशॉप मधून जेसीबीची चोरी

अहिल्यानगर-वर्कशॉप मध्ये दुरूस्तीसाठी ठेवलेला सुमारे 27 लाख 50 हजार रूपये किमतीचा जेसीबी व एक लाख 34 हजार रूपये किमतीचे दुरूस्तीचे साहित्य असा 28 लाख 84 हजार 500 रूपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदरचा गुन्हा अल्पवयीन गुन्हेगारी टोळीने केला असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.यासंदर्भात बापू बन्सी सोनवणे (वय 35, रा. हिंगणगाव, ता. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. सोनवणे यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये जेसीबी खरेदी केला होता. एका गुन्ह्यात जप्त असलेला हा जेसीबी न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना 11 नोव्हेंबर 2025 रोजी परत मिळाला होता. त्यानंतर सोनवणे यांनी 14 नोव्हेंबर रोजी जेसीबीचे काम करण्यासाठी कल्याण बायपास रस्त्यावरील काकडे इंजिनियर्स वर्कशॉप येथे लावला होता. बुधवारी (19 नोव्हेंबर) रात्री आठ ते गुरूवारी (20 नोव्हेंबर) सकाळी सात वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी वर्कशॉप मधून हा जेसीबी चोरून नेला.

याव्यतिरिक्त, जेसीबीमध्ये दुरूस्तीसाठी ठेवलेले एक लाख 34 हजार 500 रूपये किमतीचे साहित्यही चोरीला गेले आहेत. चोरीला गेलेल्या जेसीबी आणि साहित्याची एकूण किंमत 28 लाख 84 हजार 500 रूपये आहे. सोनवणे यांना जेसीबी चोरीला गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून जेसीबी चोरीच्या मागे अल्पवयीन मुलांची टोळी असण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles