Wednesday, September 10, 2025

जिच्या नादापायी बीडच्या उपसरपंचाने आयुष्य संपवलं ती पूजा गायकवाड कोण?

बीडमधील गेवराई तालुक्यातील एका माजी उपसरपंचाने मंगळवारी डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.. ते कला केंद्रातील पूजा गायकवाड या नर्तिकेच्या प्रेमात वेडे झाले होते. पूजा गायकवाड गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याशी बोलत नव्हती. त्यामुळे गोविंद बर्गे यांना काहीच सुचेनासे झाले होते.सोमवारी रात्री ते पूजाच्या घरी गेले होते. मात्र, त्याठिकाणी अपेक्षित गोष्टी न घडल्याने गोविंद बर्गे यांनी याच नर्तिकेच्या घरासमोर कारमध्ये स्वत:च्या कानशि‍लात गोळी झाडून आत्महत्या केली.पूजा गायकवाड ही कला केंद्रात नर्तिका असून ती 21 वर्षांची आहे.दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांची ओळख झाली होती.कालांतराने पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांच्या प्रेमसंबंध निर्माण झाले.पूजा गायकवाड ही इन्स्टाग्रामवर तिच्या नाचण्याचे अनेक रिल्स शेअर करायची.गोविंद बर्गे यांनी प्रेमप्रकरण सुरु असताना पूजा गायकवाड हिला पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन आणि सोन्याचे दागिने दिले होते.गेल्या काही दिवसांपासून पूजा गायकवाड ही गोविंद बर्गे यांच्याशी बोलत नव्हती. त्यामुळे गोविंद बर्गे नैराश्यात होते.

पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांच्याकडे गेवराईतील बंगला आपल्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर जमीन करा, अशी मागणी केली होती.गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने पूजा गायकवाड हिच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे.पोलिसांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles