Friday, February 20, 2026

कल्याण रोड ते उद्धव ॲकॅडमी दरम्यान कचऱ्याचे ढीग.. रोगराई पसरण्याची भीती

*उद्धव अकॅडमी शाळा ते कल्याण रोड पर्यंत कचऱ्याचे साम्राज्य, नागरिकांच्या आरोग्य धोक्यात*

अहिल्यानगर : नगर कल्याण रोड हा तसा उच्चशिक्षित आणि नोकरदार वर्ग असणारा भाग आहे, परंतु या भागातच मोठ्या प्रमाणावर कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला अनेकांना नाकाला रुमाल बांधून फिरावे लागत आहे. अत्यंत कचऱ्याचा उग्र असा घाण वास सुटत आहे, या ठिकाणी कचराकुंडीची सोय नसल्याने अनेक ठिकाणी कुठेही नागरिक कचरा टाकत आहे. उद्धव अकॅडमी शाळा ते कल्याण रोड या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात कचराकुंडी झालेली आहे. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सुद्धा सदरील कचरा उचलला जात नसल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी त्या ठिकाणी पसरली आहे. या माध्यमातूनच अनेक आजारांचा फेलाव होत असतो

त्यामुळे नागरिकांच्या वतीने महानगरपालिकेला विनंती करण्यात येत आहे की उद्धव अकॅडमी शाळा ते कल्याण रोड पर्यंत साठलेला कचरा उचलून घेण्यात यावा.

कल्याण रोड

परिसरातील नागरिकांना सुशिक्षित नागरिकांना विनंती आव्हान करण्यात आहे की महानगरपालिकेच्या घंटागाडीमध्येच कचरा टाकण्यात यावा अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून आरोग्याला धोकादायक होईल अशा पद्धतीने वागू नये व घंटागाडी मध्येच कचरा टाकण्यात यावा. या रस्त्यावर पुढील तीन ते चार दिवसात कॅमेरे सीसीटीव्ही बसवण्यात येणार

आहे जे व्यक्ती त्या ठिकाणी कचरा टाकून टाकताना दिसेल त्याची तक्रार महानगरपालिकेत केले जाईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या कचरा टाकणाऱ्या व्यक्तीची असेल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles