Wednesday, October 29, 2025

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांना मोठा धक्का; नगरपंचायतीचे ११ नगरसेवकांनी…..

अहिल्यानगर- जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आठ नगरसेवक तीन काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभापती तथा भाजपचे नेते आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्यासोबत रविवार रात्री गुप्त बैठक केली या बैठकीत कर्जत नगरपंचायतीत लवकरच खांदेपालट होण्याचे संकेत देण्यात आले आहेत त्यामुळे आमदार रोहित पवार यांना धक्का मानला जात आहे या बैठकीबद्दल प्राध्यापक राम शिंदे यांनीही दुजोरा दिला आहे

कर्जत नगरपंचायतीमध्ये आमदार रोहित पवार यांनी एक हाती सत्ता मिळवत भाजपच्या प्राध्यापक राम शिंदे च्या सत्तेला सुरुंग लावला होता कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 12 तर काँग्रेसचे तीन आणि भाजपला दोन जागा मिळाल्या होत्या नगराध्यक्षपदी उषा राऊत तर काँग्रेसच्या रोहिणी घुले या उपनगराध्यक्ष होत्या त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या मात्र एकाच कुटुंबाकडे पदे जात असल्याने नाराजी उफाळून आली दुसरीकडे महाराष्ट्रात महायुती सरकार आल्याने पुन्हा प्राध्यापक राम शिंदे यांना साथ देऊन कामे मार्गी लावत विकास निधी मिळवायचा असा निर्धार करत रविवारी रामनवमीचे औचित्य साधत 11 नगरसेवकांनी भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles