Friday, October 31, 2025

करुणा शर्मा-धनंजय मुंडेंचे लग्नासारखेच संबंध; कोर्टाचे शिक्कामोर्तब एकाच घरात राहून दोन मुलांना जन्म दिला

करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच होते असे निरीक्षण माझगाव कोर्टानं नोंदवलं आहे. त्यांनी 2 मुलांना जन्म दिला आहे. हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही असं निरीक्षण माझगांव सत्र न्यायालयानं दिलं आहे. धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना कोर्टानं तीव्र शब्दात ताशेरे ओढले आहेत. तसेच करुणा मुंडे यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी दिलेलं आव्हानं शनिवारी फेटाळं आहे.

धनंजय मुंडे यांचा दावा कोर्टाकडून अमान्य
दरम्यान, कोर्टाच्या या आदेशाची प्रत एबीपी माझाच्या हाती लागली आहे. आपल्या याचिकेत करुणा शर्मा यांच्याशी लग्न केलं नसल्याचा धनंजय मुंडे यांचा दावा कोर्टाकडून अमान्य करण्यात आला आहे. त्यामुळं करुणा शर्मा या घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळण्यास पात्र असल्याचा निर्वाळा कोर्टानं केला आहे. करुणा व त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी आपल्या आदेशांत म्हटलेलं आहे.करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच होते असे निरीक्षण माझगाव कोर्टानं नोंदवलं आहे. त्यांनी 2 मुलांना जन्म दिला आहे. हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही असं निरीक्षण माझगांव सत्र न्यायालयानं दिलं आहे. धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना कोर्टानं तीव्र शब्दात ताशेरे ओढले आहेत. तसेच करुणा मुंडे यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी दिलेलं आव्हानं शनिवारी फेटाळं आहे.

धनंजय मुंडे यांचा दावा कोर्टाकडून अमान्य
दरम्यान, कोर्टाच्या या आदेशाची प्रत एबीपी माझाच्या हाती लागली आहे. आपल्या याचिकेत करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्याशी लग्न केलं नसल्याचा धनंजय मुंडे यांचा दावा कोर्टाकडून अमान्य करण्यात आला आहे. त्यामुळं करुणा शर्मा या घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळण्यास पात्र असल्याचा निर्वाळा कोर्टानं केला आहे. करुणा व त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी आपल्या आदेशांत म्हटलेलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles