Friday, October 31, 2025

धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षा क्रूर, मी जे काही भोगलंय…; करुणा शर्मांचे गंभीर आरोप

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्याबाबतच्या खटल्यात महिना दोन लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय मुंबईतील माझगाव न्यायालयाने कायम ठेवला आहे. दोन मुलांना जन्म देणं हे एका घरात राहिल्याशिवाय शक्य नाही असंही न्यायालयाने म्हटलं आहे. यानंतर करुणा शर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षा क्रूर व्यक्ती आहे असं मत व्यक्त केलं आहे.
काय म्हणाल्या करुणा शर्मा?

“न्यायालयाने जो निकाल दिला त्याबद्दल मी न्यायाधीशांचे आभार मानते. खूप चांगली गोष्ट त्यांनी निकालात नमूद केली. आमदार किंवा मंत्र्याच्या पत्नीला तसंच राहणीमान असला पाहिजे. धनंजय मुंडे मला भेटला तेव्हा आम्ही विद्यार्थी होतो. त्याने संघर्ष केला तेव्हा मी माझी मालमत्ता विकली. दोनदा मंगळसूत्रही गहाण ठेवलं होतं. मी ते पैसे त्यांना (धनंजय मुंडे) दिले होते. मंत्री झाल्यानंतर ऐश करण्यासाठी तुम्ही बाजारु महिलांना ठेवत आहात. याचे माझ्याकडे पुरावे आहेत. मी त्याबाबत गप्प बसणार नाही. माझ्याशी जे वागलं गेलं ते क्रूर पद्धतीने ते वागले आहेत. न्यायाधीशांना सगळ्या गोष्टी माहीत नाहीत कारण मी सगळे पुरावे उघड केलेले नाहीत. माझ्या बहिणीचे व्हिडीओ, आईची आत्महत्या, मी विष प्यायलं होतं. या सगळ्या गोष्टी समोर आणणार आहे. असं

“मी ४५ दिवस तुरुंगात होते. इतका नीचपणा कुणीही संपूर्ण भारतात कधी केला नसेल. औरंगजेबही यांच्यापुढे (धनंजय मुंडे) फिका पडेल इतक्या नीच वृत्तीचे हे लोक आहेत. औरंगजेबाने त्याच्या पत्नीला तुरुंगात टाकलं नसेल. अत्यंत नीच प्रवृत्तीचे लोक आणि माझ्यासह जे २७ वर्षे त्यांनी घालवली तीदेखील क्रूर म्हणावी अशीच होती. दोन मुलांकडे बघून मी सहन करत होते. येत्या काळात मी सगळ्या गोष्टी बाहेर काढणार आहेत. यामध्ये फक्त धनंजय मुंडे नाहीत इतरही लोक आहेत की सगळ्यांना शिक्षा होणार आहे.” असंही करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.
धनंजय मुंडे खोटारडे-करुणा शर्मा

” धनंजय मुंडेंच्या खोटारडेपणाला काही सीमा नाही, माझ्या नावावर २००३ मध्ये आम्ही घर खरेदी केलं होतं ते घर करुणा धनंजय मुंडे या नावावर होतं. मात्र आता धनंजय मुंडे हे वकिलामार्फत जे कोर्टाला सांगत आहेत ते खोटं आहे. २००३ मध्ये धनंजय मुंडे कुठे आमदार होते?” असाही सवाल करुणा शर्मा यांनी विचारला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles