बोल्हेगाव प्रभागातील महिलांकडून माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांना राखी, ५०० बहिणींच्या उपस्थितीत सामूहिक रक्षाबंधन, महापौरपदाची अपेक्षा व्यक्त
बहिणींचा विश्वास संपादन करत नातं टिकवण्याचे काम केले – कुमारसिंह वाकळे
अहिल्यानगर : बोल्हेगाव प्रभाग क्रमांक ७ मधील महिलांच्या वतीने माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांना राखी बांधून सामूहिक रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गेल्या ३ वर्षांपासून परंपरेप्रमाणे बहिणी या सोहळ्यात सहभागी होत असून यंदाही तब्बल ५०० महिलांनी राखी बांधत भावबंध दृढ केला. यावेळी बोलताना माजी सभापती कुमारसिंह वाकळे म्हणाले की, “गेल्या १० वर्षांत मी नगरसेवक म्हणून केवळ विकासकामेच केली नाहीत तर सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगी प्रभागातील बहिणींसोबत खंबीरपणे उभा राहिलो. माझे नाते हे फक्त मतदार व नगरसेवकापुरते मर्यादित नाही तर कौटुंबिक आहे. राखी पौर्णिमेनिमित्त इतक्या मोठ्या संख्येने बहिणींनी माझ्यावर विश्वास दाखवून राखी बांधली ही माझ्यासाठी खरी संपत्ती आहे. मी आयुष्यभर या बहिणींच्या संरक्षणासाठी, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी कटिबद्ध आहे. बहिणींचा विश्वास संपादन केला व नातं टिकवण्याचे काम केले. समाजामध्ये जे वागलो त्याची पावती मिळाले असून कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाला आहे. असे प्रतिपादन मनपा माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी व्यक्त केले.
कांचन इंगोले यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “रस्ते, पाणी, लाईट यांसारख्या मूलभूत समस्या सोडवून कुमारसिंह वाकळे यांनी आम्हाला मोठा दिलासा दिला. त्यामुळे आमचे नाते फक्त समाजकारणापुरते न राहता भावाबहिणीच्या बंधनात रूपांतरित झाले आहे.
वैशाली राजहंस यांनी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित करताना म्हटले की, “महिलांना छेडछाड करणाऱ्यांना त्यांनी वेळोवेळी चाप लावला. बहिणींच्या संरक्षणासाठी भावाप्रमाणे उभे राहून सुरक्षिततेची हमी दिली.
शामल तिवारी म्हणाल्या की, “बोल्हेगाव हा पूर्वी ग्रामीण स्वरूपाचा भाग होता. पण विकासकामांमुळे त्याला शहरीकरणाची दिशा मिळाली. जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करून देत कुमारसिंह वाकळे यांनी महिलांची खरी काळजी घेतली. त्यामुळेच आज ते प्रभागातील प्रत्येक घरचे भाऊ झाले आहेत.
रक्षाबंधन सोहळा हा फक्त औपचारिक नव्हता तर प्रभागातील महिलांनी कुमारसिंह वाकळे यांना आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी शुभेच्छा देत महापौर पदाची अपेक्षा व्यक्त केली. सुमारे ५ तास चाललेल्या या कार्यक्रमात महिलांचा उत्साह, आनंद, संवाद आणि कौटुंबिक वातावरण अनुभवायला मिळाले. यावेळी रंजना आमतकर, शैलजा गिऱ्हे, रूपाली नलगे, अनिता निकम, श्यामला तिवारी, ज्ञानेश्वरी चाफे, विमल पंडीत, कांचन इंगवले, अनिता कऱ्हाडे, पुजा म्हस्के, साधनाताई बोरूडे, वैशालि राजहंस, रजनिताई अमोदकर, मोनालि धुपधरे, रोहिणी भडके, प्रज्ञा खरात, अश्विनि जाधव, शुभांगी लांडगे, संगिता कराळे, पुजा फाळके, शितल कराळे, राणी ढाकणे, हर्षदा कोठावदे, वंदना अहिरे, पुजा मरकड, राधिका भोसले, मोनिका काळे, शितल एडके, उषा आव्हाड, रूथ मिसाळ, सविता केदारी, रोहिणी अंकुश, शितल कुलट, सुवर्णा वाळके, रेघिना साळवे, जया म्हस्के, सानिका नेमण, मनिषा तागड, रूपालि गाडेकर, शितल अनाप, आरति फाळके, पुजा फाळके, रीता वासनकर, कावेरी भवर, चंद्रकला मरकड, शितल मरकड, सुवर्णा गवळी, शैला गिऱ्हे, प्रियंका थोरवे, आरति दुसंगे, स्वाति दुसंगे, सुलभा पुरी, रूपालि नलगे, सुनिता गाडेकर, विमल पावडे, प्रतिभा दुधाळ, रोहिणी कराळे, स्वाति चौधरी, दीपालि कराळे, छाया धिवर, अनिता भालेराव, सारीका राठोड, भारति राख, मिरा सोनटक्के, पुजा फसले, कावेरी भवर, सुरेखा शिंदे, अश्विनी मिसाळ, मोनालि शेळकेआदींसह प्रभागातील शेकडो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


