Friday, March 13, 2026

कुंभ मेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसा लव्ह जिहादची शिकार? मुस्लीम बॉयफ्रेंडशी लग्न केल्याने दावा

प्रयागराज येथील कुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या घाऱ्या डोळ्याच्या मोनालिसाने आता लग्न केले आहे. आपल्या बॉयफ्रेंडसोबत केरळमध्ये जाऊन तिने विवाह केल आहे. लग्नावेळी ती अल्पवयीन असल्याचा दावा केला जात होता. परंतु त्यात तथ्य नसल्याचे मोनालिसा आणि तिच्या पतीकडून सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या लग्नाला तिच्या कुटुंबीयांकडून विरोध होता. म्हणूनच मोनालिसाने पोलीस संरक्षणात हा विवाह केला आहे. गेल्या दीड वर्षांपासून ती फरमान नवाच्या मुलाच्या प्रेमात होती. दरम्यान, आता फरमान आणि मोनालिसाचे लग्न म्हणजे लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा दावा केला जात आहे. याबाबतही खुद्द मोनालिसाने समोर येऊन खुलासा केला आहे.

मोनालिसाने समोर येत दिले पुरावे
मोनालिसाने मंदिरात जाऊन लग्न केल्यानंतर तिच्या विवाहाबाबत वेगवेगळे दावे केले जात होते. तिचा बॉयफ्रेंड मुस्लीम असल्यामुळे तर वेगवेगळे दावे केले जात होते. मोनालिसा लव्ह जिहादचा बळी ठरली आहे, असा दावा तर अनेकजण करत होते. परंतु या सर्व चर्चा खोट्या असल्याचे मोनालिसानेच पुढे येऊन सांगितले आहे. लग्न झाल्यानंतर मोनालिसा आणि फरमान यांनी एकत्र येत लग्न केले. यावेळी त्यांनी मोनालिसाच्या वयाचा पुरावा सादर केला. तसेच लव्ह जिहादच्या आरोपावर बोलताना आम्ही हिंदू विवाह पद्धतीने लग्न केले आहे. फरमान माझ्याशील लग्न करण्यास तयार नव्हता. मीच लग्नासाठी त्याच्या मागे लागले होते, असे मोनालिसाने स्पष्ट केले.तसेच, आमच्या विवाहात कुठेही लव्ह जिहाद नाही. मी मुस्लीम आहे. तर मोनालिसा अजूनही हिंदू आहे. आम्ही कुठेही एकमेकांचा धर्म बदललेला नाही. उलट आम्ही हिंदू विवाह पद्धतीने लग्न केलेले आहे. यापुढेही मोनालिसाला जे चांगले वाटेल तेच होईल. तिच्या इच्छेविरोधात मी जाणार नाही, असे फरमान याने स्पष्ट केले. प्रेमाला जात धर्म नसतो, हे सांगायलाही फरमान विसरला नाही.
https://x.com/PTI_News/status/2032004483086237948?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2032004483086237948%7Ctwgr%5E761608e80551352cbf65ce5c32417859a3905087%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fentertainment%2Fkumbh-mela-viral-girl-monalisa-said-her-marriage-is-not-love-jihad-example-1625167.html
दरम्यान, मोनालिसा आणि फरमान यांनी समोर येत आम्ही स्वखुशीने लग्न केले आहे. आम्ही आमचा धर्म बदललेला नाही, असे सांगितल्याने आता लव्ह जिहादचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोनालिसाचा लवकरच एक चित्रपट आहे. फरमान हादेखील अभिनेता आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles