लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता जमा झाला आहे. मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. मे महिन्याच्या हप्ता कधी येणार हा प्रश्न तर महिला विचारतच आहेत. परंतु २१०० रुपये कधी मिळणार असाही प्रश्न महिला विचारताना दिसत आहे. दरम्यान,२१०० रुपयाबाबत महायुतीचे नेते छगन भुजबळांनी मोठं वक्तव्य केलं आहे.छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास थोडा उशीर का येतात यावर भाष्य केलं आहे.लाडकी बहीण योजनेत अडचणी आहेत. घरात एखाद्या वेळी खर्च वाढतो तसेच आहे. काही वेळा उशिरा पैसे येतात. शासकीय पैसे कुठेही जात नाही. लाडकी बहीण, लेक लाडकी योजनेचे पैसे इकडे गेले तिकडे गेले तेव्हा इतर मंत्री ठणाणा करतात.लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे मिळणार आहेत. 1500 रुपये व्यवस्थित मिळाले की 2100 पण मिळतील. नवीन योजना आहे. शंका कुशंका उपस्थित करू नये,असं छगन भुजबळांनी म्हटलं आहे.
लाडकींना २१०० मिळणार
लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार की नाही याबाबत चर्चा सुरु आहे. २१०० रुपयांबाबत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले आहेत.दरम्यान, आता लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळतील, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर महिलांना २१०० रुपये मिळणार असल्याचेही महायुती सरकारने सांगितले आहे. त्यामुळे आता राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची महिलांना वाट पाहावी लागणार आहे. २१०० रुपयांबाबत अधिकृत घोषणा कधी होईल, याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत.


