लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे.त्यामुळे आता महिलांच्या जुलैच्या हप्त्याची प्रतिक्षा संपली आहे.९ ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे. आदिती तटकरेंची एक्स या अकाउंटवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट.माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी (१५०० रुपये) वितरित करण्यात येणार आहे.रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या दिवशी पैसे मिळतील असे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता याबाबत अधिकृत घोषणादेखील करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या लाभासाठी निधीदेखील वितरीत करण्यात आला आहे.लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ऑगस्टच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. फक्त जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी देण्यात येईल, असं सांगितलं आहे. त्यामुळे त्यानंतर ऑगस्टचा हप्ता दिला जाईल.


