मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारला राज्यात पुन्हा सत्तेत आणण्यासाठी गेमचेंजर ठरली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांना ईकेवायसी पूर्ण करावी लागणार आहे. महिला व बालविकास विभागाकडून त्यासंदर्भातील पोर्टल विकसित करण्यात आलं आहे. या पोर्टलवर ईकेवायसी करताना ओटीपीबाबत तांत्रिक अडचणी महिलांना येत असल्याचं समोर आलं होतं. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्टकरुन ओटीपीबाबत येणाऱ्या अडचणींची बाब निदर्शनास आल्याचं सांगितलं. ईकेवायसीमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील, असंही त्यांनी म्हटलं.
मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे E-KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपायोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन E-KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते, असं आदिती तटकरेंनी म्हटलं.
https://x.com/iAditiTatkare/status/1974091404608471084?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1974091404608471084%7Ctwgr%5E2b412cf77bedd9edd6516465ce948a4e9c2acb14%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fbusiness%2Fmukhyamantri-majhi-ladki-bahin-yojana-aditi-tatkare-said-ekyc-otp-problem-noted-solution-will-available-soon-marathi-news-1389210


