Tuesday, November 4, 2025

लाडक्या बहि‍णींना गुड न्यूज, बँक खात्यावर आजपासून १५०० रूपये जमा होणार

महाराष्ट्रातील लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर आजपासून १५०० रूपये खटाखट जमा होण्यास सुरूवात होणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबत बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे. पुढील दोन दिवस राज्यातील पात्र लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ऑक्टोबरचे १५०० रूपये जमा होतील, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय. आजपासून १५०० रूपयाचे वितरणाची प्रक्रिया सुरू कऱण्यात आली आहे. टप्याटप्प्याने पुढील दोन दिवसात सर्व पात्र महिल्यांच्या खात्यात १५०० रूपये जमा होणार आहेत. सर्व महिलांनी केवायसी करावी, असेही आवाहन तटकरेंनी केलेय. त्यासाठी त्यांनी अंतिम तारीखही (Deadline for Ladki Bahin e-KYC completion) सांगितली आहे.

ऑक्टोबर महिन्याचा हप्ता खात्यावर कधी जमा होणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून राज्यातील लाडक्या बहि‍णींमध्ये उत्सुकता होती. अखेर, ही प्रतिक्षा संपली आहे. राज्यातील सर्व लाडक्य बहि‍णींच्या खात्यावर आजपासून १५०० रूपये वितरीत केले जाणार आहे. आदिती तटकरेंनी सोमवारी याबाबतची माहिती दिली. लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक अपात्र महिलांनी आणि काही पुरूषांनीही घेतल्याचे समोर आले. त्यानंतर या योजनेसाठी आता प्रत्येकवर्षी ई केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. त्यासाठी मंत्रालयाकडून ठराविक कालावधी देण्यात आला आहे.

मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ई केवायसीबाबत माहिती दिली. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरचा आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, असे तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles