लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आता पुढच्या ३ महिन्याचे हप्ते एकत्रितपणे येऊ शकतात. लाडकीच्या खात्यात आता ४५०० रुपये एकत्र जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नोव्हेंबर-डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता येऊ शकतो. लाडकी बहीण योजनेत महिलांना तीन हप्ते एकत्र येऊ शकतात. लाडकी बहीण योजनेत प्रत्येक महिन्याला १५०० रुपये दिले जातात. नुकताच ऑक्टोबरचा हप्ता वितरित करण्यात आला आहे. त्यानंतर महिला नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारत आहेत.राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. काल निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या. एकूण ३ टप्प्यात निवडणूका होती. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान, नोव्हेंबरमध्ये आता नगरपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या. त्यानंतर लगेचच जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होतील. या काळात आचारसंहिता लागू असेल. आचारसंहितेच्या काळात कोणत्याही योजनेअंतर्गत निधी दिला जात नाही. त्यामुळे कदाचित महिलांना त्याआधीत एकत्रितपणे ४५०० रुपये दिले जाऊ शकतात.
मागच्या वर्षी विधानसभेच्या निवडणूका ऑक्टोबर महिन्यात जाहीर झाल्या होत्या. नोव्हेंबर महिन्यात निवडणूका झाल्या होत्या. त्यामुळे त्यावेळी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्र दिले होते. त्यामुळेच यावेळीदेखील पैसे एकत्र येऊ शकतात. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


