राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात आचारसंहिता जाहीर झाली आहे. दरम्यान, आता आचारसंहितेच्या काळात लाडकी बहीण योजनेत महिलांना पैसे मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, आता नोव्हेंबरचा महिना सुरु होऊन १० दिवस झालेत तरीही अद्याप हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे आता पैसे कधी मिळणार याबाबत महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
लाडकी बहीण योजनेत आचारसंहिता लागू झाल्यावरही पैसे दिले जातील, असं सांगितलं आहे. त्यामुळे यापुढे कधीही महिलांना पैसे दिले जाऊ शकतात. शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकीचा हप्ता पुढे ढकलला जात आहे. त्यामुळेच या महिन्याचा हप्ता कदाचित पुढच्या महिन्यात येऊ शकतो. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच अधिकृतपणे घोषणा केली जाईल.
निवडणूक आयोगाने नगरपरिषदेची निवडणूक जाहीर केली. त्याआधीच ऑक्टोबरचा हप्ता देण्यात आला होता. यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात जिल्हापरिषदेच्या निवडणुका जाहीर करण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निवडणुका जाहीर होण्याआधीच महिलांना पैसे दिले जाऊ शकतात.
लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे आता अनिवार्य केले आहे. यासाठी १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. आता महिलांकडे फक्त ८ दिवस उरले आहेत. महिलांनी ८ दिवसात ऑनलाइन पद्धतीने केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा तुम्हाला पुढच्या महिन्यापासून पैसे मिळणार नाहीत.


