लाडकी बहीण योजनेत आता महिलांना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडलेला आहे. नोव्हेंबर महिना अर्धा संपला असूनही अद्याप हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. मात्र, लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील असं सांगण्यात येत आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लाडकी बहीण योजनेत जवळपास अडीच कोटी महिलांना लाभ घेत आहेत.यातील लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या महिलांचे लाभ बाद केलेत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. या योजनेतून जवळपास ५० लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत.
लाडकी बहीण योजनेत फक्त ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच लाभ मिळणार आहे. यामध्ये महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी. २१ ते ६५ वयोगटातील महिलांनाच लाभ मिळणार आहे. महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे. एकाच कुटुंबातील फक्त एका महिलेलाच योजनेचा लाभ मिळणार आहे. कुटुंबात चारचाकी वाहन असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.
लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, नगरपरिषद आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. या निवडणुका २ आणि ३ डिसेंबर रोजी होणार आहे. त्याआधी कदाचित महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जाऊ शकतात.
लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता केवायसीसाठी डेडलाइन वाढवून दिली आहे. आता तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत केवायसी करु शकतात. यासाठी आधी मुदत १८ नोव्हेंबरपर्यंत होती. अजूनही १ कोटींपेक्षा जास्त महिलांचे केवायसी बाकी आहे. त्यामुळेच मुदत वाढवून दिली आहे.


