महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लाडली बहना योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आजपासून पैसे मिळणार आहे. मध्य प्रदेशमधील सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात आजपासून पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना आज १५०० रुपये मिळणार आहे. लाडली बहना योजनेत आतापर्यंत ३० हप्ते जमा केले आहेत. त्यानंतर आज ३१ वा हप्ता दिला जाणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव डीबीटीद्वारे महिलांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे. सीएम मोहन यादव यांनी स्वतः एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत माहिती दिली आहे.मुख्यमंत्री सीएम यादव यांनी म्हटलंय की, लाडक्या बहिणींच्या खात्यात ३१ व्या हप्त्याचे वितरण… ९ डिसेंबर २०२५ रोजी लाडली बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये जमा केले जाणार आहे. एकूण १.२६ कोटी महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत.
लाडली बहना योजनेत याआधी १२५० रुपये दिले जात होते. यानंतर आता या योजनेअंतर्गत निधी वाढवण्यात आला आहे. महिलांच्या खात्यात एकूण १५०० रुपये जमा करण्यात येणार आहे. २५० रुपयांनी हप्ता वाढवण्यात आला आहे.
मध्य प्रदेश सरकारने ३१ वा हप्ता जारी केला आहे. मध्य प्रदेशमधील महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात. दरम्यान, तुम्हाला पैसे येणार की नाही हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात. तुम्हाला लाडली बहना योजनेच्या पोर्टलवर जाऊन लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे चेक करायचं आहे. जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत.


