Saturday, February 21, 2026

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आदिती तटकरेंची खास पोस्ट, म्हणाल्या आजच

खात्यात ३ हजार रूपये येणार की ४५०० रूपये येणार, याची उत्सुकता राज्यातील लाडक्या बहिणींना लागली आहे. कारण, नाव्हेंबर-डिसेंबर या दोन महिन्याचा लाभ अद्याप खात्यात अद्याप आला नाही. त्यात जानेवारी सुरू होण्यास फक्त ४ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात ४५०० येतील, असेही बोलले जातेय. ही सगळी उत्सुकता लाडक्या बहिणींमध्ये असतानाच मंत्री आदिती तटकरे यांनी ट्वीट करत महत्त्वाचे आवाहन केलेय. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहि‍णींना खास आवाहन केलेय. आदिती तटकरे यांनी लाडक्या बहि‍णींना ई केवायसी करण्याचे आवाहन केलेय. शेवटचे ४ दिवस राहिलेत, ई केवायसी करून घ्यावे असे आवाहन तटकरेंनी केलेय.

“लाडक्या बहिणींनो…मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी E-Kyc प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख असून, आता केवळ शेवटचे ४ दिवस उरले आहेत. सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली E-Kyc प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती !”

आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री

लाडक्या बहिणींनो…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी E-Kyc प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख असून, आता केवळ शेवटचे ४ दिवस उरले आहेत.

सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली E-Kyc प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र…
या लाडक्या बहि‍णींचा लाभ बंद होणार –

३१ डिसेंबर २०२५ पर्यंत राज्यातील सर्व लाडक्या बहि‍णींना आपली ई केवायसी पूर्ण करायची आहे. ज्या महिलांनी ई केवायसी केली नाही, त्या महिलांचा प्रति महिना १५०० रूपयांचा लाभ बंद होणार आहे. आतापर्यंत राज्यातील ४० लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. त्या सर्व लाडक्या बहि‍णींचा मासिक लाभ बंद होणार आहे. आदिती तटकरेंनी राज्यातील लाडक्या बहि‍णींना ई केवायसी करण्याचे आवाहन केलेय. त्यामुळे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत केवायसी करवी, अन्यथा त्यांचाही लाभ बंद होणार आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात अनेक महिलांचे लाभ बंद होण्याची शक्यता आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles