Wednesday, February 25, 2026

लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा अत्यंत महत्वाचा निर्णय, आदिती तटकरे यांचा थेट आदेश

राज्य सरकारने राज्यातील गरीब महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केलेली आहे. राज्यातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत लाडक्या बहि‍णींना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. गावाखेड्यातील महिलांना या योजनेमुळे मोठा फायदा झालेला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाडक्या बहि‍णींना वेळोवेळी eKYC करावी लागते. राज्य सरकारने ईकेवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख दिली होती. मात्र अनेक महिलांची ईकेवायसी करताना चूकीचा पर्याय निवडला होता. त्यामुळे या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. आता अशा महिलांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.राज्य सरकारने लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिला आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत ट्विट करताना अधिकाऱ्यांना महत्त्वाचा आदेश दिला आहे. आदिती तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे.

या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. तथापि, काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

https://x.com/iAditiTatkare/status/2013625791284920453?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2013625791284920453%7Ctwgr%5E1b29837e7b6d29f14503d4cf1c325cce4989639b%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fmaharashtra%2Fbig-news-about-ladki-bahun-yojana-aaditi-tatkare-order-for-ekyc-and-verification-1587494.html

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles