लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी
केवायसीतील चुकीमुळे लाखो महिलांचे लाभ बंद
आता या महिलांची पुन्हा केवायसी होणार
लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थ्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे. ई केवायसी करुनही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे ई केवायसीत झालेली चूक. दरम्यान, लाखो महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही. यानंतर आता महिलांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
ई-केवायसी करुनही लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाल्याच्या खूप तक्रारी समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता लाभ बंद झालेल्या महिलांची प्रत्यक्ष फेरपडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका महिलांची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहे. यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहेज्या महिलांचे लाभ बंद झाले आहेत अशा महिलांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर लाभार्थ्यांनी पुन्हा ई केवायसी करा, अशी मागणी केली होती. यानंतर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता महिलांची फेर ई केवायसी होणार आहे. या निर्णयामुळे महिलांना पुन्हा एकदा लाभ मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
शासनाने फेर ई केवायसीचा निर्णय घेतल्याने महिलांना पुन्हा एकदा लाभ मिळणार आहे. केवायसीमध्ये ज्या महिला निकषांमध्ये बसतात त्यांच्यासाठी योजनेचा लाभ असाच सुरु राहणार आहे. यामध्ये महिलांचे उत्पन्न, घरातील कोणी सरकारी नोकरीत नाही ना, एकाच कुटुंबातील किती जण योजनेचा लाभ घेतात, या सर्व गोष्टींची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतरच लाभ सुरु ठेवायचा की नाही याचा निर्णय घेतला जाईल.


