Thursday, February 19, 2026

खुशखबर! लाडक्या बहिणींच्या खात्यात ६००० रुपये जमा होणार? रखडलेले ४ हप्ते एकत्र येणार

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात अजूनही जानेवारीचा हप्ता जमा झालेला नाही. महिलांच्या खात्यात पैसे कधी येणार याची सर्वजण वाट पाहत आहेत. दरम्यान, लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असं सांगण्यात येत आहे. याचसोबत आता अनेक महिलांना मागच्या ३ महिन्याचे पैसे आले नाहीत. आता महिलांना सर्व हप्ते एकत्र मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे. महिलांना डिसेंबरपासून मार्चचे ६००० रुपये एकत्र मिळणार का असा प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झाला आहे.लाडकी बहीण योजनेत महिलांच्या ई केवायसी करताना अनेक चुका झाल्या आहेत.ईकेवायसीमधील चुकांमुळे महिलांच्या खात्यात डिसेंबरपासून पैसे जमा झाले नाहीत. केवायसीमध्ये प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्याने ही अडचण झाली आहे. दरम्यान, त्यानंतर केवायसीमधील चुका सुधारण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतर सर्व रखडलेले पैसे एकत्र येणार का असा प्रश्न पडला आहे.

लाडकी बहीण योजनेत केवायसीमधील दुरुस्ती करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जर तुम्ही त्याआधी हे काम केले नाही तर पैसे बंद होणार आहेत. महिलांना वेबसाइटवर जाऊन केवायसी करायची आहे. त्यानंतरच महिलांचा लाभ पुन्हा सुरु होईल.अनेक महिलांच्या खात्यात डिसेंबरपासून पैसे जमा झाले नाहीत. केवायसीमध्ये दुरुस्ती झाल्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे. महिलांच्या खात्यात चार महिन्याचे ६००० रुपये एकत्र येऊ शकतात. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles