Friday, February 20, 2026

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट!अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाई होणार, अजित दादांची मोठी घोषणा

लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांनी नियमांबाहेर जाऊन लाभ घेतले आहेत. लाडकी बहीण योजनेत अडीच हजारपेक्षा जास्त सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला आहे. या महिलांवर आता कारवाई करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. अपात्र महिलांवर कारवाई केली जाणार नाही, असं अजित पवारांनी सांगितलं आहे. दिलेले पैसे काढून घेण्याचा काही प्रश्नच येत नाही. जसं आपण शोधतोय तसतसं अनेक अपात्र बहि‍णींनी लाभ घेतला असल्याचे समोर येत आहे. त्यानुसार आपण काम करत आहोत.लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांवर कारवाई करणार नाही. या योजनेत काही चुका झाल्या आहेत, अशीही कबुली त्यांनी दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, या निकषात न बसणारे अर्ज करणार नाहीत.मात्र, काही जणांनी अर्ज केले आणि लाभदेखील घेतला. दिलेले पैसे परत घेण्याचा प्रश्नच येत नाही. आता त्याची व्यवस्थित माहिती घेतली जाणार आहे. ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळायला पाहिजे, त्याच लाभार्थ्यांसाठी ही योजना सुरु ठेवली जाणार आहे.लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता अजूनही आलेला नाही. लाडकी बहीण योजनेत मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार असल्याचे सांगितले जात आहे. वटपोर्णिमेच्या दिवशी हे पैसे येण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत महिला व बालविकास विभागाने अधिकृत माहिती दिलेली नाही.

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांच्या पडताळणी सुरु केली आहे. या योजनेत आता आयकर विभागाकडून लाभार्थी महिलांची माहिती काढण्यात आली आहेत. त्यातील ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles