Saturday, February 21, 2026

लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे पैसे संक्रांतीनंतरच? निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष

: महाराष्ट्र सरकारच्या
लाडकी बहिण योजनेला आमचा विरोध नाही पण महानगर पालिकेची निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहिण योजनेचे पैसे वितरीत करण्यात यावेत अशी मागणी काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबतचे पत्र काँग्रेसने निवडणूक आयोगला पाठवलं आहे. यावर राज्य निवडणूक आयोगाकडे उत्तर दिलं आहे. काँग्रेसच्या तक्रारीवर विचार करु असं आयोगानं उत्तर दिलं आहे. त्यामुळं आता निवडणूक आयोग नेमका काय निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या दोन महिन्यांचे 3000 रुपये एकत्रीत देण्याचा घाट सरकारने घातला आहे. ही बाब 1 कोटीहून अधिक महिला मतदारांना प्रभावीत करेल व निवडणुकीच्या दिवशी मतदान सत्तारुढ पक्षाच्या उमेदवारांना करण्यास प्रवृत्त करणार आहे. एक प्रकारची सामुहीक सरकारी लाच आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग या सरकारी कृतीने होत आहे. लाडकी बहिण योजनेला आमचा विरोध नाही. डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 चे लाडकी बहिण योजनेचे पैसे निवडणूक संपल्यानंतरच असे निर्देश आयोगाने शासनास द्यावेत अशी विनंती पत्राद्वारे काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles