Tuesday, March 10, 2026

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा झटका,एका झटक्यात लाखो महिलांचा लाभ कायमचा बंद

लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील तब्बल २ लाख ८३ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. आता या महिलांना पैसे मिळणार नाहीयेत. त्यामुळे महिलांमध्ये निराशा निर्माण झाली आहे.बीड जिल्ह्यात २ लाख ८३ हजार महिला अपात्र ठरल्या आहे. सरकारने लावलेल्या निकषांमध्ये न बसल्याने या महिलांचा लाभ बंद केला आहे. आता सरकारने महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी केली आहे. याचा पटका लाखो महिलांना पडला आहे. यामध्ये अनेक महिला निकषांमध्ये बसत नाही म्हणून त्यांचे अर्ज बाद केले आहेत. तर अनेक महिलांनी केवायसी केली नाही त्यामुळे त्यांचा लाभ बंद केला आहे.लाडकी बहीण योजनेत केवायसीमध्ये चुका झाल्या असतील त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. केवायसीमध्ये अनेकांनी चुका केल्या आहेत त्यामुळे त्यांचा लाभ बंद झाला आहे. आता या महिलांनी ३१ मार्चपर्यंत केवायसीमध्ये दुरुस्ती करायची आहे. दुरुस्ती केल्यानंतर या महिलांचा लाभ पुन्हा सुरु केला जाईल. महिलांच्या खात्यात रखडलेले हप्ते जमा केले जातील.

फेब्रुवारी-मार्चचा हप्ता एकत्र येणार?

लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी-मार्चचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मार्च महिना सुरु झाला तरीही अजून फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही. त्यामुळे आता फेब्रुवारी-मार्चचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles