Wednesday, September 10, 2025

सरकारी नोकरीचे आमिष, थेट मंत्रालयात मुलाखती, तरुणांच्या कोट्यवधींच्या फसवणुकीची व्याप्ती मोठी ,ठगाला अटक

सरकारी नोकरीचे अमिष दाखवून ठकबाज टोळीने थेट मंत्रालयात मुलाखत घेऊन अनेक तरुणांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने लॉरेन्स हेनरी या ठगबाजाला अटक केली आहे. या प्रकरणात सुमारे एक कोटी साठ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. पण या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचं तपासातून पुढे आलं आहे.

या फसवणुकीप्रकरणी सध्या एकूण चार जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणाची व्याप्ती पाहता आरोपींची सख्या वाढण्याची शक्यता आहे. नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना हेरून त्यांना लाखोंचा गंडा घालण्याचा एक प्रकार नागपुरात उघडकीस आला. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात ठगबाज आरोपीच्या टोळीने तरुणांची मुलाखत थेट मंत्रालयात घेतल्याचे ही उघडकीस आले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल ही फसवणुकीच्या या प्रकरणातून झाली आहे.राहुल तायडे या नागपूरच्या तरुणाची लॉरेन्स हेनरी नामक ठकबाजाशी 2019 मध्ये ओळख झाली. लॉरेन्स, त्याची पत्नी शिल्पा आणि सहकाऱ्यांनी राहुल तायडेला सरकारी नोकरीचे अमिष दाखवत वेळोवेळो त्याच्याकडून तब्बल 9 लाख 50 हजार उकळले.

मंत्रालयात कनिष्ट लिपिकाची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली आरोपींनी त्याची थेट मंत्रालयात मुलाखत घेतली. त्याकरता मंत्रालयातील खोटे दस्तावेज, बनावट आयडी कार्डचा वापर केला गेला. तसेच मंत्रालयातील कथित अधिकाऱ्यांनी त्याची मुलाखत घेतल्याचं सोंग केलं. नंतर राहुल तायडे यांची मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली.

एक कोटी साठ लाखांची फसवणूक
याप्रकरणी लॉरेन्स हेनरी या ठगबाजाला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. याशिवाय अजून तीन आरोपी फरार आहेत. या ठगबाजांच्या टोळीने प्राथमिक तपासात एक कोटी साठ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचे उघडकिस आले आहे. मात्र या प्रकरणाची व्याप्ती अजून बरीच मोठी असल्याचं पोलीस तपासात समोर येत आहे.आरोपींनी 2019 मध्ये पैसे घेऊनही जॉइनिंग लेटर न दिल्यामुळे तायडे यांनी त्यांच्या मागे तगादा लावला होता. आरोपींनी त्यांना काही दिवस शांत करण्यासाठी मंत्रालयीन आयकार्डसुद्धा दिले होते. परंतु, अनेक दिवस होऊनही आरोपींनी नोकरीवर रुजू करून न घेतल्यामुळे तायडे यांनी नागपूरच्या हुडकेश्वर ठाण्यात तक्रार दिली.

या प्रकरणातील आरोपी लॉरेन्स हेनरीला मागील आठवड्यात मुंबईतून अटक करण्यात आली. राज्यातील अनेक तरुणांना नोकरीच्या आमिष दाखवून

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles