Saturday, December 13, 2025

दिव्यांग कर्मचार्‍यांची यादी अहिल्यानगर जिल्हा परिषद संकेतस्थळावर प्रसिध्द

अहिल्यानगर -दिव्यांग विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने गेल्या महिनाभरात जिल्हाभरातील अंपग कर्मचार्‍यांच्या केलेल्या पडताळणीत जिल्ह्यात 550 अंपग कर्मचारी आढळून आलेले आहेत. यापैकी 289 कर्मचार्‍यांचे अंपगत्व हे डोळ्यांनी दिसत असून उर्वरित 254 कर्मचार्‍यांच्या अंपगत्वाबाबत जिल्हा परिषद प्रशासनाला खात्री होत नसल्याने अशा सर्व कर्मचार्‍यांच्या अंपगत्व, अंपगत्व प्रमाणपत्र (युडीआयडी) नंबर याची आरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात सापडलेल्या 550 कर्मचार्‍यांची यादी गुरूवारी सांयकाळी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणार्‍या दिव्यांग अधिकारी व कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राचे युडीआयडी कार्ड, तसेच या कर्मचार्‍यांनी सेवेसह अन्य योजनांचा घेतलेला लाभ याबाबत राज्य दिव्यांग विभागाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या. यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेने त्यांच्या सर्व कर्मचार्‍यांंपैकी दिव्यांग कर्मचारी व त्यांचे प्रमाणपत्र (युडीआयडी) याची पडताळणी करण्याचे आदेश राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी महिन्यांपूर्वी दिले होते. मुंडे यांच्या आदेशानंतर नगर जिल्हा परिषदेने दिव्यांग कर्मचारी व त्यांच्या प्रमाणपत्रासह युडीआयडीची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी जिल्हा परिषद प्रशासन अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आणि अपंग प्रमाणपत्र सादर केलेल्या सर्व कर्मचार्‍यांचे, अपंग कोठ्यातून विविध सवलती घेतलेल्या कर्मचार्‍यांची पडताळणी केली.

यात जिल्हा परिषदेकडे कार्यरत असणारे 550 कर्मचारी अंपग असल्याचे समोर आले. यातील 289 कर्मचार्‍यांचे अपंगत्व हे प्रथमदर्शनी डोळ्यांनी दिसत आहे. मात्र, 254 कर्मचार्‍यांचे अपंगत्वाबाबत प्रशासनाला शंका आहे. यात कर्णबधीर, अल्पदृष्टी आणि 40 टक्क्यांपेक्षा जादा अस्थिव्यंग असणारे कर्मचार्‍यांचा समावेश आहे. या सर्व कर्मचार्‍यांची यादी जिल्हा परिषद प्रशासन पडताळणीसाठी आरोग्य उपसंचालक यांना पाठवणार आहे. यात हे अपंग बनावट अपंग आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येवून त्यांचा अहवाल दिव्यांग कल्याण विभागाला पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

अकोले 47 (13), संगमनेर 50 (33), राहाता 14 (1), श्रीरामपूर 14 (5), नेवासा 46 (28), राहुरी 28 (10), नगर 87 (47), श्रीगोंदा 39 (13), कोपगरगाव 14 (7), पारनेर 55 (21), कर्जत 39 (19), जामखेड 19 (13), पाथर्डी 47 (25), शेवगाव 36 (13), नगर मुख्यालय 15 (6) एकूण 550 (254) असे आहेत.

जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या अपंग प्रमाणपत्र पडताळणी मोहिमेत 12 कर्मचारी यांनी तपासणीला दांडी मारली. तर 81 कर्मचार्‍यांचे अंपग प्रमाणपत्र (युडीआयडी) क्रमांक नसल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासन या कर्मचार्‍यांचे युडीआडी नंबर काढणार असून तो नसल्यास संबंधित अपंग प्रमाणपत्र हे बनावट ठरणार आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील काही प्राथमिक शिक्षकांनी बदलीत लाभ घेण्यासाठी आजारपणासह विविध आजारपणाचे कागदपत्रे सादर करत बदलीचा लाभ घेतलेला आहे. अशा सर्व शिक्षकांची प्राथमिक शिक्षण विभागाकडून तपासणी सुरू असतांना आता पुन्हा दिव्यांग आयुक्त मुंडे यांच्या आदेशाची भर पडली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles