महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका नोव्हेबरमध्ये होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी 10 नोव्हेंबर आधी आचारसंहिता लागू होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. आयोगाकडून यासंदर्भात लवकरत अधिसूचना काढली जाणार आहेत.
मागील पाच ते सात वर्षांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयाकडून ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाकडून राज्यातील निवडणुकीची तयारी जोरात करण्यात येत आहे. सूत्रांने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात दोन टप्प्यात निवडणुका होऊ शकता.


