Tuesday, October 28, 2025

लागा तयारीला……राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नोव्हेंबरमध्येच

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. मिनी मंत्रालयासह नगरपालिका, नगर परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकींचा धुरळा उठणार आहे. लोकल बॉडी इलेक्शन नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे उणापुरा एक महिनाच पक्ष, नेते आणि कार्यकर्त्यांच्या हातात असल्याचे समोर येत आहे. दिवाळीतील फटाके जपून ठेवा. कारण एका महिन्यानंतरच कदाचित तुम्हाला फटाके फोडण्याचा उत्साह आवरता येणार नाही.येत्या नोव्हेंबर महिन्यात नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निवडणुकीनंतर राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दर 20 दिवसांच्या कालावधीने निवडणुका होतील असा दावा सूत्रांनी केला आहे. या मोठ्या अपडेटमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावणार आहे. कारण दिवाळीनंतर लागलीच या निवडणुकींची लगबग सुरू होईल. यंदा प्रचाराला किती दिवस मिळतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. एकतर मोठ्या खंडानंतर ग्रामीण भागात निवडणुकांचा धुरळा उठणार असल्याने कार्यकर्ते, स्थानिक नेत्यांमध्ये सळसळता उत्साह दिसत आहे.

नोव्हेंबर अखेरीस नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर जिल्हा परिषद आणि अखेरीस महानगरापालिका अशा टप्प्याटप्प्याने या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन महिने राज्यात राजकीय हालचाली, फोडाफोडी, आयाराम-गयारामचे राजकारण दिसून येईल. अनेकांचे पक्ष प्रवेश होतील. अनेकांना नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य होण्याचे वेध लागले आहे. भाजपने या निवडणुकीसाठी अगोदरच कंबर कसली आहे. इतर पक्षही मोर्चे बांधणी करत आहेत. पण महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना ते ते पक्ष सामोरं जातील का, याचे कार्ड सर्वच पक्षांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. त्यामुळे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत दिसून येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी बंडाळी होऊ शकते. तर काही ठिकाणी काँटे की टक्कर ही दिसतील. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक गणितं वेगळी असल्याने परस्परविरोधी पक्ष एकत्रित येत सत्ता स्थापन करण्याची दाट शक्यता आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles