Thursday, March 19, 2026

लोणावळा हादरलं! तरूणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, एक आरोपी अटक दोन आरोपी पसार

लोणावळ्यामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. तीन तरूणांनी कारमध्ये एका तरूणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. निर्जन रस्त्यावर तरूणांनी तरूणीला कारमध्ये खेचलं अन् सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीला तात्काळ अटक केली असून दोन जणांचा शोध घेतला जात आहे. लोणावळ्यातील या घटनेनंतर पुण्यामध्ये खळबळ उडाली आहे.

लोणावळा शहरात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नांगरगाव येथील दत्त मंदिर दत्त सोसायटी शेजारील एका निर्जन रस्त्यावर एक तरुणी संशयास्पद रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली. याबाबत लोणावळा शहर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांनी या तरुणीला शेजारी असलेल्या एका मंदिरात ठेवले होते. अतिशय घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या तरूणीवर प्रथम वैद्यकीय तपासणी केली. पोलिसांनी तरूणीचा जबाब नोंदवला.

तरूणीवर 25 ते 30 वयोगटातील तीन अज्ञात व्यक्तींनी कारमध्ये जबरदस्तीने ओढलं. तिघांनी तरूणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही लोणावळा परिसरातील आहे. तरूणी तुंगार्ली गावातील एका रस्त्याने जात होती, त्यावेळी कारमधून आलेल्या अज्ञात व्यक्तीने तोंड दाबून गाडीमध्ये जबरदस्तीने डांबले. तरूणांनी तिचा मोबाईल काढून घेतला. त्यानंतर हात बांधून, तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही घटना समोर येताच लोणावळ्यात एकच खळबळ उढाली. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका तरूणाला बेड्या ठोकल्या आहेत. लोणावळा शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles