Monday, February 23, 2026

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच सर्वसामान्यांच्या खिशाला झटका; एलपीजी सिलेंडर महाग

आज एक फेब्रुवारी 2026. आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. पण, देशाचा नव्या वर्षाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच देशातील सर्वसामान्यांना महागाईचा झटका लागला आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. 1 फेब्रुवारी 2026 पासून दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई यांसारख्या प्रमुख शहरांसह देशभरात एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. एलपीजी सिलेंडरच्या किंमतींत झालेली वाढ ही 19 किलोंच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतींत करण्यात आली आहे. बजेटच्या दिवसापासून सिलेंडर 50 रुपयांपर्यंत महाग झाला आहे. दरम्यान, 14 किलोंच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.प्रत्येक नवा महिना अनेक आर्थिक बदलांसह सुरू होतो आणि फेब्रुवारीमध्ये अनेक मोठे बदल झाले आहेत (1 फेब्रुवारीपासून नियम बदल), आणि पहिल्याच बदलामुळे महागाईनं ग्रस्त असलेल्या लोकांना मोठा धक्का बसला आहे. खरं तर, अर्थसंकल्पाच्या दिवशी, तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत, ज्यामुळे ते 1 फेब्रुवारीपासून 50 रुपयांनी महाग झाले आहेत.

एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढण्याचा हा सलग दुसरा महिना आहे. जानेवारीच्या सुरुवातीला तेल विपणन कंपन्यांनी किंमती १११ रुपयांपर्यंत वाढवल्या होत्या. दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1580.50 वरून 1691.50 रुपये झाली. कोलकातामध्ये किंमत 1684 वरून 1795 रुपये, मुंबईत 1531.50 वरून 1642.50 रुपये आणि चेन्नईमध्ये किंमत 1739.50 वरून 1849.50 रुपये झाली आहे.गेल्या काही महिन्यांत, 19 किलोंच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतींत सातत्यानं बदल होत आहेत, तर घरगुती गॅस सिलेंडर 8 एप्रिल 2025 रोजी जे बदल झाले, तेच आजवर कायम आहेत. 1 फेब्रुवारी रोजी, 14 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत मुंबईत 852, दिल्लीत 853, कोलकातामध्ये 879 आणि चेन्नईमध्ये 868 होती, तेच दर आजही कायम आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles