मुख्यमंत्री फडणवीसांसह चौंडीला येणारे मंत्रिमंडळ ‘पुरणपोळी’, ‘शिपी आमटी’, ‘शेंगोळ्यां’वर ताव मारणार;
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभापती राम शिंदेच्या वतीने दिले सर्व मंत्र्यांना जेवणाचे निमंत्रण.
जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह चौंडीला येणारे अख्ख मंत्रिमंडळ ‘पुरणपोळी’, ‘शिपी आमटी’, ‘शेंगोळ्यां’वर ताव मारणार असून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभापती राम शिंदेच्या वतीने सर्व मंत्र्यांना जेवणाचे निमंत्रण दिले आहे. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे .
चौंडी येथे ६ मे होणा-या राज्य मंत्रीमंडळा बैठकीवर जेवणाचा होणारा सर्व किती हा प्रश्र होता. मात्र हा खर्च विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी उचलला असून, चौंडी गावचे सुपुत्र म्हणून सभापती शिंदे यांनी मंत्रीमंडळ बैठकीच्या निमित्ताने येणा-या सर्वांचे आदरातिथ्य करणार आहेत. असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली .
राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, ३६ मंत्री, सहा राज्यमंत्री, विविध विभागाचे सचिव तसेच , प्रशासकीय अधिकारी, पोलिस बंदोबस्त, राज्यातून येणारे आमदार, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जवळपास दोन ते तीन हजार व्यक्तींचे जेवणाचे नियोजन आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीचा जेवणाचा मेन्यू काय असेल,याची उत्सुकता होती. जिल्हा प्रशासनाने पूर्वी ठरवलेलाच मेन्यूच कायम ठेवण्यात आला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने पहिल्यादांच महायुतीच्या राज्य सरकारची चौंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. ही बैठक पूर्वी २९ एप्रिलला होणार होती. परंतु ती तारीख पुढे ढकलण्यात आली. ही बैठक आता सहा मे रोजी होत आहे. या बैठकीची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. मंडप डेकोरेशनची जय्यत तयारी सुरू असुन प्रशासनाकडून सर्व ठिकाणची पाहणी चालु आहे . या बैठकीच्या तयारीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर आहे. मंडप, ध्वनिक्षेपक, व्यासपीठ, शामियाना, ग्रीन हाऊस, असं सर्व मिळून नियोजनासाठी एक कोटी २८ लाख रुपयांची निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रसिद्ध केली असून, त्यापध्दतीने प्रशासनाने तयारी सूरू केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीची तारीख निश्चित झाल्यानंतर प्रशासन पुन्हा कामाला लागलं असून, जोरदार तयारी सुरू केली आहे. तरी देखील बैठकीवर होणारा खर्चाचा विषय चर्चेतच आहे.
दरम्यान, या बैठकीसाठी मंत्र्यासह राज्यातून दोन ते तीन हजार लोकं येण्याची शक्यता आहे. या सर्व जेवणाचा खर्च विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे उचलणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम चौंडीत सुरू झाल्यापासून सभापती राम शिंदे हे देशभरातून येणाऱ्या भाविकांना जेवण देतात. तिच परंपरा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनिमित्तानं राम शिंदे जपणार आहेत.
पुरणपोळी, शिपी आमटी, मासवडी, शेंगोळे..
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या कर्जतची शिपी आमटी, पुलाव, पुरणपोळी, कुरडई, थालीपीठ, खवा पोळी, मासवडी, आमटी भाकरी, कोथिंबीर वडी, हुरडा थालीपीठ, शेंगोळे, वांग्याचे भरीत, डाळबट्टी, मटकी, मसाला वांगे, स्पेशल शिंगोरी आमटी, भात, बाजरी भाकरी, दही-धपाटे, आमरस चपाती, वांगी भरीत भाकरी, हुलग्याचे शेंगोळे, आलू वडी, मूग भजी, शेवगा भाजी, शिंगोरी आमटी-ठेचा-भाकरी, भाकरी थाळी, म्हैसूर बौंडा, मांडे, बीट थालपीठ या महाराष्ट्रीयन मेन्यूचा जेवणामध्ये समावेश आहे.
प्रा राम शिंदेंच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले जेवणाचे निमंत्रण.
मुंबईत नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौंडीत होणा-या राज्य मंत्रीमंडळ बैठकीसाठी सभापती राम शिंदे हे जेवण देणार असून, राम शिंदे यांच्यावतीने सर्व मंत्र्यांना मी जेवणाचे निमंत्रण देत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत सांगितले होते.


