Tuesday, October 28, 2025

Video: माधुरी दीक्षितचा ‘एक नंबर तुझी कंबर’ वर डान्स; नृत्यातील अदाकारी …

बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दिक्षीत. माधुरी ही तिच्या सौंदर्यासह नृत्याने देखील ओळखली जाते. सोशल मीडियावर देखील माधुरी तिचे डान्सचे व्हिडीओ शेअर करते. आतादेखील माधुरीने संजू राठोडच्या गाण्यावर ठेका धरला आहे. ज्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे.

अभिनेत्री माधुरी दिक्षीतने सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर डान्समधील व्हिडीओ शेअर केला आहे. या डान्स व्हिडीओमध्ये माधुरीने जबरदस्त डान्स केला आहे. एक नंबर तुझी कंबर असं या गाण्याचं नाव आहे. मराठमोळ्या अंदाजात माधुरीने साडी नेसली आहे. गुलाबी साडीतील माधुरीच्या अदा पाहून चाहते भलतेच घायाळ झाले आहेत.

मागील अनेक दिवसांपासून संजू राठोडचं एक नंबर तुझी कंबर हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नेटकऱ्यांसह अनेक सेलिब्रिटींनी या गाण्यावर रिल्स केल्या आहेत. अभिनेत्री माधुरी दिक्षीतला संजू राठोडच्या एक नंबर तुझी कंबर गाण्याची भूरळ पडली आहे. तिने डान्स करत व्हिडीओ शेअर केली आहे. कॅप्शनमध्ये ‘व्हाईब्स=शेकी, मूव्हज = अनस्टॉपेबल’ असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर माधुरीच्या रिलवर नेटकऱ्यांनी हजारो लाईक्स दिल्या आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles