देशभरात दिवाळीचा सण साजरा केला जात असून दिवाळी बोनसही अनेक कर्मचाऱ्यांना मिळालाय. त्यामुळे सणाचा आनंद वाढलाय. त्याचदरम्यान राज्य सरकारने महसूल विभागातील अधिकाऱ्यांसाठी एक खूशखबर दिली आहे. गेल्या दहा वर्षांपासून बढत्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांना गोड बढत्या झाल्याची बातमी मिळाली आहे.
आज राज्याच्या महसूल विभागातील 47 अधिकाऱ्यांना बढत्या देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्राला नवे 47 अपर जिल्हाधिकारी मिळालेत. गेल्या काही वर्षांपासून अधिकाऱ्यांच्या बढत्या रखडल्या होत्या. ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारकडून आज शासन आदेश जारी करण्यात आलाय.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट दिलीय. आज मंत्रालयातील दालनात जाऊन बावनकुळे यांनी राज्यातील सर्वच जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यानंतर बढत्यांची घोषणा केली. महसूल विभाग जनतेच्या आशा, आकांक्षांना मूर्तरूप देणारा विभाग आहे.
हा विभाग अधिकाधिकपणे जनताभिमुख व्हावा. पारदर्शी रहावा, यासाठी सगळे मिळून प्रयत्न करू. सर्वसामान्य जनतेशी थेट संबंध येणाऱ्या मोजक्या शासकीय विभागांपैकी एक विभाग असल्याचं बावनकुळे यावेळी म्हणाले. दरम्यान अधिकाऱ्यांच्या पद पात्रता तपासून त्यांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत. तसेच पदोन्नत झालेले अधिकारी जर ३० दिवसांचे आत रूजू न झाले नाहीत तर त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील तरतुदीनुसार शिस्तभंग कारवाई केली जाणार आहे.
पदोन्नती मिळालेले अप्पर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी)
प्रज्ञा त्रिंबक बडे-मिसाळ (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, नाशिक)
किरण बापु महाजन (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, नांदेड)
रवीकांत कटकधोंड (खाजगी सचिव, मा. मंत्री, मत्स्यव्यवसाय व बंदरे)
प्रदिप प्रभाकर कुलकर्णी (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, गोंदिया)
जगन्नाथ महादेव विरकर (सदस्य सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग)
शिवाजी व्यंकटराव पाटील (विशेष कार्य अधिकारी, अपर मुख्य सचिव, महसूल, मंत्रालय, मुंबई)
दीपाली वसंतराव मोतीयेळे (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, भंडारा)
संजय शंकर जाधव (अपर आयुक्त (सामान्य प्रशासन), अमरावती विभाग, अमरावती)
प्रताप सुग्रीव काळे (अपर आयुक्त क्र. 1, विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर)
निशिकांत धोंडीराम देशपांडे (मा. राज्यपालांचे प्रबंधक, राजभवन, मुंबई)
सुहास शंकरराव मापारी (प्रशासकीय अधिकारी, मा. मुख्यमंत्री कार्यालय)
मोनिका सुरजपालसिंह ठाकूर (अतिरिक्त आयुक्त, (पिंपरी चिंचवड) महानगरपालिका, पुणे)
स्नेहल हिंदूराव पाटील भोसले (निबंधक, सारथी, पुणे)
मंदार श्रीकांत वैद्य (खाजगी सचिव, मा. मंत्री, पर्यावरण व वातावरणीय बदल, मंत्रालय, मुंबई)
सरिता सुनिल नरके (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, सांगली)
डॉ. राणी तुकाराम ताटे (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, सोलापूर)
मृणालिनी दत्तात्रय सावंत (सहयोगी प्राध्यापक, यशदा, पुणे)
पांडुरंग शंकरराव बोरगांवकर (कांबळे) (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, लातूर)
नरेंद्र सदाशिवराव फुलझेले (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, बुलढाणा)
सुषमा वामन सातपुते (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, कोल्हापूर)
अरूण बाबुराव आनंदकर (अतिरिक्त महासंचालक, महाऊर्जा, पुणे)
रिता प्रभाकर मेत्रेवार (अपर आयुक्त (महसूल), विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर)
वंदना साहेबराव सूर्यवंशी (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, जालना)


