Thursday, October 30, 2025

दहीहंडी आणि अनंत चतुर्दशीची सुट्टी रद्द, त्याऐवजी या सणाला मिळणार सुट्टी

महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने नारळी पोर्णिमेच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने परिपत्रक जारी केले आहे. दोन सुट्ट्यांमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार, दोन सुट्ट्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. हे बदल सरकारी कार्यालये, शाळा आणि कॉलेजला लागू होणार आहेत. २०२५ मध्ये गोपाळकाळा १६ ऑगस्टचा सुट्टी नारळी पोर्णिमेला म्हणजे आज देण्यात आली आहे. याचसोबच अनंत चतुर्दशीची म्हणजे ६ सप्टेंबरची सुट्टी रद्द करुन ती ज्येष्ठगौरी विसर्जनाच्या दिवशी देण्यात आली आहे. म्हणजे तुम्हाला २ सप्टेंबर २०२५ रोजी सुट्टी असणार आहे. स्थानिक सिटी मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी असणार आहेत.

नवीन सुट्ट्यांबाबत राज्य सरकारने नवीन परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार नारळी पोर्णिमा आणि ज्येष्ठ गौरी पोर्णिमेला सुट्टी मिळणार आहे. परंतु अनंत चतुर्दशीला सुट्टी राहू द्या, अशी मागणी गणेशोत्सव समितीने केली आहे. त्यामुळे नारळी पोर्णिमा आणि ज्येष्ठ गौरी विसर्जनाच्या दिवशी शाळा, कॉलेजलादेखील सुट्टी असणार आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन होते. त्या दिवशी खूप जास्त गर्दी असते. या दिवशी मुंबईच्या रस्त्यावर खूप गर्दी असते. परंतु आता गणपती विसर्जनाच्या दिवशीच कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार नाहीये. हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी धक्कादायक होता. दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुट्टी असते. याचसोबत दहीहंडीच्या दिवशीही अनेकजण घराबाहेर पडतात आणि दहीहंडी पाहतात. या दिवशीची सुट्टी रद्द करुन ती सुट्टी आज म्हणजे नारळी पोर्णिमेला देण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles