राज्यातील सुमारे अडीच हजार शासकीय पशुवैद्यक (पशुधनावर उपचार करणारे शासकीय डॉक्टर आणि 4 हजार पशुधन पर्यवेक्षक 10 मार्च रोजी सामूहिक राजीनामे देण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील हजारो शासकीय पशु रुग्णालयातील वैद्यकीय सेवा पूर्णपणे कोलमडून शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट उभा राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेने पशुसंवर्धन विभागाच्या अमानवीय आणि तुघलकी धोरणाविरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. अत्यल्प मनुष्यबळ असताना एक एक पशुवैद्यकावर अनेक गावांचा कारभार सोपवण्यात आलं असून आधीच कामाच्या ओझ्याखाली दबलेल्या पशुवैद्यकांना रात्री उशिरा ही तात्काळ सेवा देण्याची अपेक्षा पशुसंवर्धन विभाग ठेवत असल्याचा आरोप राजपत्रित पशुवैद्यक संघटनेने केला आहे. 2500 शासकीय पशुवैद्यक आणि 4000 पशुधन पर्यवेक्षक काम बंद आंदोलन आणि त्यानंतर सामूहिक राजीनामे देणार असल्यामुळे राज्यातील शासकीय पशु वैद्यकीय यंत्रणा कोलमडण्याची भीती आहे.
अत्यल्प मनुष्यबळावर एक एक पशुवैद्यकावर अनेक गावांचा कारभार सोपवला…
शासकीय पशु दवाखान्यांच्या वेळा कारण नसताना बदलण्यात आल्या..
फिल्डचे काम डोक्यावर टाकले असताना बायोमेट्रिक उपस्थिती बंधनकारक केली…
सतत ऑनलाईन अहवाल आणि ॲपवर अपडेट साठी दबाव टाकले जाते…
रात्री उशिरा तात्काळ सेवा देण्याची अवाजवी अपेक्षा ठेवली जाते…
तांत्रिक अधिकाऱ्यांवर अतांत्रिक कामे सोपवण्यात आली..
2 मार्च रोजी सुमारे अडीच हजार पशुवैद्यकांनी शासनाच्या व्हाट्सअप ग्रुप बहिष्कार घालत सोडले आहे.
4 मार्च रोजी सर्व पशुवैद्यक काळ्याफिती लावून काम करणार…
5 मार्च रोजी सामूहिक रजा घेतली जाणार…
6 मार्च रोजी सर्व शासकीय अहवाल देणे बंद केले जाईल…
9 मार्च रोजी राज्यभर उपोषण केले जाईल…
0 मार्च रोजी 2500 पशुवैद्यक आणि 4000 पशुधन पर्यवेक्षक सामूहिक राजीनामे देतील…


