Monday, November 3, 2025

बारावी बोर्डाचा निकाल जाहीर,बारावीच्या निकालातही मुलींची बाजी

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. बारावीचे विद्यार्थी आणि पालक निकाल कधी लागणार याची वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा आज संपली. बारावीचा निकाल नुकताच बोर्डाकडून जाहीर करण्यात आला आहे. बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे.

दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना वेबसाईटवर जाऊन आपला निकाल पाहायला मिळणार आहे. त्याचसोबत निकालाची प्रत डाऊनलोड करून घेता येणार आहे. राज्य मंडळाचा हा निकाल ‘https://results.digilocker.gov.in’ आणि ‘https://mahahsscboard.in’ या वेबसाईटवर पाहता येणार आहे. राज्य मंडळाने यंदा मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करत नवा विक्रम केला आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आज बारावीचा निकाल जाहीर केला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कोकण विभागाने बाजी मारली आहे. फेब्रुवारी २०२४ चा निकाल ९३.३७ टक्के होता. तर यावर्षी ९१.८८ टक्के निकाल लागला आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकाल १.४९ टक्क्यांनी कमी आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. बारावीची परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळांतर्फे घेण्यात आल्या होत्या.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. त्यामध्ये ८,१०,३४८ मुलं, ६,९४,६५२ मुली आणि ३७ ट्रान्सजेंडर आहेत. एकूण १०५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती. तर या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याथ्यांसाठी ३३७३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

विभागनिहाय निकाल २०२५

कोकण -९६.७४
कोल्हापूर ९३.६४
मुंबई – ९२.९३
संभाजीनगर – ९२.२४
अमरावती – ९१.४३
पुणे -९१.३२
नाशिक -९१.३१
नागपूर – ९०.५२
लातूर – ८९.४६
निकाल कुठे पाहाल –

१. https://results.digilocker.gov.in

२. https://mahahsscboard.in

३. http://hscresult.mkcl.org

४. https://results.targetpublications.org

५. https://results.navneet.com

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles