राज्यातील धडाडीचे आयएएस अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढेंची बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्या असंघटीत कामगार आयुक्तपदावरून बदली करण्यात आली असून आता राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे ते सचिव असतील. तुकाराम मुंढे यांच्यासोबत इतर चार अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.
1. तुकाराम मुंढे (आयएएस: आरआर: 2005) विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई यांना सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
2. नितीन काशीनाथ पाटील (आयएएस: एससीएस: 2007) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई यांना विशेष आयुक्त, राज्य कर, महाराष्ट्र, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
3. अभय महाजन (आयएएस: नॉन-एससीएस: 2007) विशेष आयुक्त, राज्य कर, महाराष्ट्र, मुंबई यांना व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
4. ओंकार पवार (आयएएस: आरआर: 2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, इगतपुरी उपविभाग, नाशिक यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
5. आशा अफजल खान पठाण – सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर यांना महासंचालक, वनमती, नागपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे आणि त्यांना सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूरचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.


