एकनाथ शिंदे साहेब तुम्ही ताराराणींचा अपमान करणाऱ्या जैन मुनीवर काय कारवाई करणार?

“जैन मुनी नयन पद्मसागर यांनी एक वादग्रस्त विधान केलय. ताराराणी जैन होत्या. ताराराणी जैन नव्हत्या. त्या मराठा होत्या. त्यांचा जन्म महाराष्ट्र तळ बीडमध्ये झालाय. ही मीहिती जैन समाजाला असली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्ध लढली. त्या युद्धात सरसेनापती हंबीरराव मोहित हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती होते. सरसेनापती हंबीररावे मोहिते यांच्या कुटुंबात एका पुत्रीचा जन्म झाला. तिचा नाव ठेवलं ताराबाई. 1675 मध्ये जन्म झाला. 10 ते 12 या वयात ताराबाईंचा विवाह राजाराम यांच्यासोबत झाला. राजाराम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र” नयन पद्मसागर यांची वक्तव्य खोडून काढताना जैन मुनी निलेश चंद्र यांनी हा इतिहास सांगितला. “राजाराम महाराजांनी चार विवाह केले होते. ताराबाई त्यांची दुसऱ्या नंबरची धर्म पत्नी आहे. हा आहे ताराबाईंचा इतिहास. राजाराम महाराज यांचा छोट्या वयात स्वर्गवास झाला. चारही बाजूंनी मोगलांनी मराठा साम्राज्याला घेरलं होतं” असं जैन मुनी निलेश चंद्र म्हणाले.

“नयन पद्मसागर यांनी सर्वप्रथम इतिहास वाचला पाहिजे. ताराराणी कोण होत्या?. ताराबाई छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या होती. त्याचं नाव ठेवलं ताराबाई. त्यांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम यांच्याशी झालं. त्यांनी भरपूर सारी युद्ध लढली. म्हणून जनतेने त्यांना ताराराणीची उपाधी दिली. ताराबाई यांचा जन्म 1675 साली तळ बीड मध्ये झाला. त्यांचा मृत्यू 1761 साली सातार जिल्ह्यात झाला. अशा प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्याचा मी विरोध करतो. महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांनी याचा विरोध केला पाहिजे” असं जैन मुनी निलेश चंद्र म्हणाले.

महावीर जयंतीच्या दिवशी एकनाथ शिंदे ठाणे टेंभीनाका येथे येतात. एकनाथ शिंदे साहेब त्या महावीर जंयतीच्या कार्यक्रमात होते. तिथे पद्मसागर यांनी हे वक्तव्य केलं. एकनाथ शिंदे साहेब तुम्ही साताऱ्याचे आहात. ताराराणींचा अपमान करणाऱ्या अशी जैन मुनीवर काय कारवाई करणार याचा तुम्ही विचार केला पाहिजे” असं निलेश चंद्र म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles