निधी मंजुरीसाठी ६ लाखांची लाच; मंत्रालयातल्या आणखी एका अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं

मंत्रालयातील आणखी एका अधिकाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्यासला आणि मंत्र्याच्या स्वीय सहायकाला लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. आता पुन्हा मंत्रालयातल्या आणखी एका अधिकाऱ्याला लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधन विभागाने अटक केली आहे.

खारघर परिसरातही कारवाई करण्यात आली आहे. लाच घेताना सापळा रचून एसीबीकडून लाचखोर अधिकाऱ्यास बेड्या ठोकण्यात आल्या. विलास लाड असं या अधिकाऱ्याचे नाव आहे. तो अर्थ व नियोजन विभागात कक्ष अधिकारी म्हणून काम करत होता. निधी मंजूर करून देण्यासाठी त्याने एकाकडे तब्बल 6 लाख 37 हजार रुपयांची लाच मागितली होती, हे लाच घेताना अटकेची कारवाई करण्यात आली.

ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करुन देण्यासाठी या अधिकाऱ्याने लाच मागितली होती, त्यानुसार 6 लाख 37 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने लाचखोर आरोपीला अटक केली. मंत्रालयातल्या लाचखोरीला चाप बसवण्यासाठी एसीबीने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यात एसीबीने कारवाईचा धडाका लावला होता.

मार्च एन्डमुळे ही कारवाई होत असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात होती. मात्र आता एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात एसीबीने पुन्हा एकदा आपला मोर्चा थेट मंत्रालयात वळवला आहे. मंत्रालयातील कक्ष अधिकारी असलेल्या विलास लाडला रंगेहाथ पकडत अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे प्रशासन आणि सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार व सर्वसामान्यांची होणारी पिळवणूक हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles