राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर १६ जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्या अनुषंगाने राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. राजकीय पक्षांमध्ये युती आणि आघाडी होत असून उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहेत. महापालिकांच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे अनेक उमेदवारांची धावपळ सुरू असल्याचं चित्र आहे.
महापालिकांच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे अनेक उमेदवारांची धावपळ आणि नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. यातच भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा रोहित खोपडे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. उमेदवारी नाकारल्याने पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका भाजापा पदाधिकारी महिलेने भाजपाचे नेते अतुल सावे आणि भागवत कराड यांनी आमच्यावर अन्याय केला. आम्ही पक्षाचं १८ वर्ष काम केलं. पण आता आम्हाला तिकीट नाकारलं. पण आता मी लढणार आहे, मी या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे, असं म्हणत भाजपाच्या पदाधिकारी महिलेने संताप व्यक्त केला.


