Thursday, September 11, 2025

अजित पवार मुख्यमंत्री होतील, फडणवीस दिल्लीला जातील, उद्धव ठाकरेंना हलक्यात घेऊ नका;,पुण्यातील ज्योतिषाच्या भाकिताने खळबळ

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी अज्ञातवासात जातील.’ असं मोठं विधान ज्योतिष अभ्यासकाने केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. पुणे शहरामध्ये ४३ वे अखिल भारतीय ज्योतिष संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनामध्ये देशभरातील ज्योतिष आणि ज्योतिष अभ्यासकांनी सहभाग घेतला आहे. हे संमेलन दोन दिवस चालणार असून यामध्ये मोठ्या संख्येने तरुण-तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण सहभागी झाले आहेत. या संमेलनामध्ये ज्योतिषांनी राज्यातील राजकीय नेत्यांपासून पीएम मोदींपर्यंत अनेकांच्या भविष्याबाबत भाकीत सांगितले.

या संमेलनामध्ये सहभागी झालेल्या एका ज्योतिष अभ्यासकाने सांगितले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्रिका खूपच मजबूत होती की त्यांनी संपूर्ण भारत कॅप्चर केला आहे. पीएम मोदींची पत्रिका खूपच मजबूत आहे. पुढच्या काही वर्षांत मोदी राजकारण सोडून अध्यात्माकडे वळतील आणि ते अज्ञातवासात जातील.’ ज्योतिषाच्या या भाकितामुळे राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

या संमेलनात आलेल्या आणखी काही ज्योतिषांनी महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या भविष्याबाबबत खळबळजनक भाकीत वर्तवले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत ज्योतिषांनी सांगितले की, ‘देवेंद्र फडणवीस हे एक ‘लंबी रेस का घोडा’ असून ते दिल्लीकडे वाटचाल करतील. दिल्लीत ते मोठ्या पदावर काम करतील.’

तर, ‘अजित पवारांची पत्रिका संघर्षाची आहे. अजित पवार त्यांना खूप संघर्षानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद मिळेल.’, तसंच, ‘उद्धव ठाकरे यांची सद्यस्थिती कितीही वाईट असली तरी त्यांना हलक्यात घेऊ नये. त्यांच्यासाठी कठीण काळ असला तरी, राजकारणात त्यांचे अस्तित्व टिकून राहील.’, असंही भाकित ज्योतिषांनी दिले. त्याचसोबत, राज ठाकरे यांना काहीही अस्तित्व नसल्याचे ज्योतिषाने सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles