उच्चशिक्षित प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी राज्य कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना साकडे
अहिल्यानगर : अहिल्यानगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नियोजित राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीसाठी आले असता महाराष्ट्र राज्य उच्चशिक्षित एम एड प्राथमिक शिक्षक कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन महाराष्ट्र राज्यातील उच्चशिक्षित प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख व विस्ताराधिकारी तथा त्या पुढील उच्च पदस्थापनेसाठी शालेय शिक्षण विभागातील संबंधित खात्यांना मसुदा तयार करणेकामी कार्यवाही करण्याचे निर्देशित करावेत, अशा प्रकारची विनंती केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य उच्चशिक्षित कृती समितीचे राज्यउपाध्यक्ष राजेंद्र निमसे यांनी दिली .
महाराष्ट्र राज्य उच्चशिक्षित एम एड कृती समितीची स्थापना झाल्यापासून गेले तीन वर्ष समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांमधून उच्च शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या शिक्षकांना रिक्त असलेल्या अनेक पदावर त्यांच्या अनुभवाच्या उच्चशिक्षित असल्याचा फायदा मिळणे कामी व शैक्षणिक गुणवत्ता विकासाचे विविध उपक्रम राबविणे कमी आरटीआय २०१९ अंतर्गत व नवीन शैक्षणिक धोरण २०२० अन्वये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या संदर्भात योग्य अंमलबजावणी करणे कामी उच्चशिक्षण संधी दिली असता वेळोवेळी राबविण्यात येणारे उपक्रमांची कार्यवाही यशस्वी होऊ शकते ,असे वारंवार संबंधित खात्याच्या मंत्र्यांना अथवा अनेक लोकप्रतिनिधी आमदार ,संबंधित विधान परिषद मधील शिक्षक आमदार यांना निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटून सांगितलेली व विनंती केलेली आहे . गेल्या तीन वर्षापासून राज्यातील उच्च शिक्षित एम एड कृती समितीने केंद्रप्रमुखांच्या संदर्भातील ४०-३०-३० % चा शासन निर्णय रद्द करून ५०- ५०% टक्के प्राथमिक शिक्षकांमधून केंद्रप्रमुख नेमण्यासंदर्भात पाठपुरावा केला तसेच त्यामध्ये असलेले वयाची व गुणांची अट रद्द करण्यासंदर्भात सुद्धा वेळोवेळी पाठपुरावा यशस्वी केला आहे .
पदवीधर शिक्षकांमधून केंद्रप्रमुख पदी पदोन्नती होणे कामी सातत्याने यशस्वी पाठपुरावा केला गेला . यापुढेही प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक यामधील उच्चशिक्षित व अनुभवी प्राथमिक शिक्षकांना उच्चपदस्थ सेवेच्या संधी काही प्रमाणात राखीव ठेवल्या जाव्यात अशा प्रकारचा प्रयत्न होणार असल्याचे राज्याध्यक्ष राजू जाधव ,राज्यकोषाध्यक्ष तेजराव देशमुख यांनी सांगितले .
लवकरच राज्यभरात बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासन स्तरावर योग्य प्रमाणात पाठपुरावा करण्याचे उच्चशिक्षित एम ए कृती समिती समिती राज्य कार्यकारिणीने जाहीर केले आहे. संबंधित पाठपुरावा शासनाकडून पूर्तता झाली नाही तर कायदेशीर बाबीचा सुद्धा निर्णय विचाराधीन असून न्यायालयीन लढाई लढण्याचा विचार असल्याचे महिला प्रमुख नसरीन बानो सय्यद (संभाजीनगर ),
पूजा धुरी (कोकण) ,सुजाता मुन (नागपूर ), राज्य प्रसिद्धी प्रमुख सूर्यकांत दडस यांनी स्पष्ट केले आहे.
मा. मुख्यमंत्री साहेबांना राज्य कृती समितीच्या वतीने निवेदन देऊन भेटल्याबद्दल राज्यउपाध्यक्ष धन्यकुमार तारळकर ( सातारा ), वसंत वाडीले (औरंगाबाद ) ,विश्वनाथ काशीद (सांगली ), मनोज देशमुख (सोलापूर ) , राज्य संपर्क प्रमुख सूर्यकांत दडस, ,चिटणीस देवीप्रसाद तावरे, जनार्धन बोटकर, राजेशढोबळे ,दिनेश मेहेर,मिलिंद पाणसंडे पुणे , नंदकिशोर आनंदवार (चंद्रपूर ) , कृष्णकार पाचकोरे ( अमरावती ) , प्रेम राठोड, ( यवतमाळ ),
बाळासाहेब देंडगे (अहिल्यानगर ), गुलाब राठोड (नागपूर ) , मोहिनी बागुल (कोकण), शिवाजी माने (सातारा ) ,अशोक पवार (सोलापूर ), राजेंद्र वेखंडे (ठाणे ), संदीप पाटील (पालघर), संजय केळकर (रत्नागिरी ), प्रल्हाद भालेकर ( अहिल्यानगर ), सचिन मुर्के (लातूर ), राजेश खैमरकोंडा (नांदेड ) , अशोक पवार (सोलापूर ), राजेंद्र उसळे (परभणी), अजय चव्हाण ( वाशिम ), मुरलीधर जोशी (हिंगोली ) , नंदकिशोर अकर्ते (नागपूर ) , नीलकंठ कुलशिंगे (बुलढाणा ), रमेश इंगळे ( नागपूर ), संजीव सपकाळ (जळगाव ), यांनी अभिनंदन केले आहे .


