Sunday, November 2, 2025

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची विविध पदांसाठी भरती ; यासाठी अर्ज कसा करायचा…

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरती होणार असून यासाठी अर्ज कसा करायचा हा प्रश्न प्रत्येकालाच निर्माण होतो. त्यामुळे परीक्षेचा अर्ज कसा भरावा कुठल्या संकेतस्थळाला भेट द्यायची याची माहिती खालील प्रमाणे जाणून घ्या…

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. नुकतेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विविध प्रशिक्षणार्थी पदांसाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती नाशिक विभागीय कार्यालयामार्फत जाहीर करण्यात आली. या भरतीसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

या भरती अंतर्गत एकूण ३६७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, ज्यात अभियांत्रिकी पदवीधर, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, मॅकेनिक (रेफ्रीजरेशन अँड एअर कंडिशनिंग), मॅकेनिक मोटार व्हेईकल, शिटमेटल वर्कर, वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रीक), पेन्टर, मॅकेनिक डिझेल, इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर आणि कारपेंटर यांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ११ ऑगस्ट २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांचे वय १४ ते ३० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी http://www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळाला सर्वप्रथम भेट द्यायची आहे. हे केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाचे संकेतस्थळ आहे. यावर विविध राज्यातील पदभरती संदर्भात माहिती दिलेली असते. या संकेतस्थळावर गेल्यावर त्यात राज्य परिवहन महामंडळाची जाहिरात आपल्याला दिसेल. ती जाहिरात उघडल्यावर त्यावर एकदा क्लिक करा. क्लिक केल्यावर त्यातून तुम्हाला अर्जाचा नमुना काढता येईल. हा अर्जाचा नमुना आपल्याला पूर्णपणे भरायचा आहे. भरलेला नमुना राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयात पाठवायचा आहे. या संदर्भात आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास आपण नजीकच्या राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयातही भेट देऊ शकता. त्यातूनही आपल्याला तेथूनही आपल्याला सविस्तर माहिती घेता येऊ शकते.

या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढीलप्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. प्रशिक्षणार्थी उमेदवारांच्या निवडीसाठी अर्जाचा नमुना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयात (एन.डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, नाशिक) येथे उपलब्ध आहे. हा अर्ज नमुना भरून कार्यालयात सादर करायचा आहे. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. राज्य सरकार वर कर्जाचा डोंगर वाढल्याने सध्या विविध विभागातील पदभरती बंद असताना एसटी महामंडळात मात्र नवीन पदभरतीची जाहिरात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles