उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन.
महात्मा फुले व अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे कर्जमाफी करावी- अशोक गायकवाड.
नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील महार व नवबौध्द शेतकऱ्यांचे जमिनीवर इनाम वर्ग ६ ब वर्ग २ चा शेरा असल्याने त्या शेतकऱ्याला जमिनीच्या बाजार मूल्याचे ५०% रक्कम नजराणा भरल्या शिवाय बीन शेती करता येत नाही तसेच इनाम वर्ग ६ ब चा शेरा सातबारा उताऱ्यावर असल्याने शर्त भंग झाला म्हणून शासनाकडे जमीन वर्ग करण्याची अनेक प्रकरणे जिल्हाधिकारी स्तरावर न्यायप्रविष्ट आहेत. पूर्वी या समाजाला हडकी, हाडोळा, शीसवळा या नावाने वतने बहाल केली होती.
ती वतने १९६० साली वतन कायद्याप्रमाणे बरखास्त करून शेतसाराचे ३ पट रक्कम भरून वर्ग २ करण्यात आली. वर्ग २ चे वर्ग १ करण्यासाठी जमिनीच्या बाजारमूल्याचे ५०% रक्कम भरण्याचा कायदा तो महाराष्ट्र इन्फेरियर व्हिलेज वतन अबोलिशन अक्ट 1959 प्रमाणे करण्यात आला. त्यातील कलम 5 मधील तरतुदी वगळण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे अशोक गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचेशी चर्चा करतांना केली याबाबत लवकरच महसूल मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयात घेण्याचे मान्य केले. सरकारने शेतकरी कर्ज मुक्तीचे धोरण घेतले. त्यात ज्या मागास वर्ग शेतकऱ्यांनी जिल्हा सहकारी बँकेकडून मध्यम मुदतीचे कर्जे घेतले ती मात्र कर्जमाफी मधे आलेली नाही. फक्त पीक कर्ज माफ झाले असुन त्याचा विचार करून ती कर्जे माफ करावीत याबाबतही चर्चा करून निवेदन देण्यात आले
महात्मा फुले व अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे कर्जमाफी करावी .उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन
- Advertisement -


