Saturday, February 21, 2026

लाच लुचपत विभागाची मोठी कारवाई; फेरफार नोंदीसाठी लाच घेताना मंडळ अधिकारी, तलाठी व शिपायाला पकडले

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथील शेतजमिनीचा फेरफार बनवून घेण्यासाठी ३० हजाराची लाच घेताना मंडळ अधिकारी, तलाठी व शिपाई या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगे हात पकडल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी या तिघांना ताब्यात घेण्यात घेवून त्यांच्यावर मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे मंडणगड तालुक्यातील शेणाळे येथे लिलावामध्ये खरेदी केलेली शेत जमीन आहे. या जमिनीचा फेरफार नोंद करुन तसा सातबारा उत्तारा संबंधीत मंडळ अधिकारी व तलाठी यांचेकडुन करुन देतो असे शिपाई मारुती भोसले याने सांगितले. याकामी यांनी तक्रारदार यांचेकडुन ५० हजार रुपयांची मागणी केली. या रक्कमे पैकी मारुती भोसले याने ४५ हजार रुपये ऑनलाईन स्विकारले. परंतु या जागे विषयीची फेरफार नोंद मंडळ अधिकारी यांनी पूर्ण रक्कम न मिळाल्याने रदद केली. त्यानंतर तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी अमित शिवगण, मंडळ अधिकारी म्हाप्रळ, श्रीनिवास श्रीरामे,तलाठी सजा म्हाप्रळ अतिरिक्त कार्यभार सोवेली व मारुती भोसले शिपाई उपकोषागार कार्यालय, मंडणगड यांची समक्ष भेट घेतली.

तेव्हा – फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकारी अमित शिगवण यांनी तक्रारदार यांचेकडून नोंदीचे काम पुर्ण करून देण्यासाठी ३० हजार रुपये लाच रक्कमेची मागणी केली. याचवेळी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने आपला सापळा रचून तक्रारदार यांचेकडून ३० हजार रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारली. तसेच स्विकारलेल्या लाच रक्कमेतील स्वतःचा हिस्सा १५५०० रुपये स्वतःसाठी ठेवुन उर्वरीत १४५०० रुपयांचा हिस्सा तलाठी श्रीनिवास श्रीरामे यांना दिला. याप्रकरणी तक्रारदार यांचेकडून लाच रक्कम स्विकारणारे मंडळ अधिकारी अभित शिगवण, ग्राम महसुल अधिकारी श्रीनिवास श्रीरामे व मारुती भोसले शिपाई उप कोषागार कार्यालय, मंडणगड यांना पंचासमक्ष लाच लुचपत विभागाच्या पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. या तिघांवर मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या कारवाईमुळे महसूल विभागामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.या तिघांवर करण्यात आलेली कारवाई शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्यूरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे. संजय गोवीलकर अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्यूरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे, सुहास शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश पाटील, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत विभाग व त्यांच्या सहकार्याने करण्यात आली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles