Tuesday, October 28, 2025

अहिल्या नगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा चोरीस गेलेला टॅक्टर व ट्रेलर चोरणाऱ्यास अटक

शेतकऱ्याचा चोरीस गेलेला टॅक्टर व ट्रेलर मोठया शिताफिने हस्तगत,
स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 08/10/2025 रोजी पहाटेच्या सुमारास कोल्हार चौक, बेलापुर बु ता. श्रीरामपूर येथे शामभाऊ बोरुडे यांचे जागेमध्ये एम.एच.17. ए. ए. 1606 ट्रॅक्टर व ट्रेलर उभे केले असता अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला आहे. सदर घटनेबाबत फिर्यादी नामे किशोर असाराम बोरुडे वय- 51 वर्षे रा.बेलापुर बु ता. श्रीरामपुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गु. र. नंबर 912/2025, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 (बी) प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.
मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी यांचे साधानाचे चोरी उघडकीस आणणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि/ संदिप मुरकुटे व पोलीस अंमलदार विजय पवार, फुरकान शेख, विशाल तनपुरे, रमिझराजा आतार, भगवान थोरात चालक भगवान धुळे यांचे पथक तयार करुन सदर पथकास ट्रॅक्टर चोरीचे गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना करण्यात आले होते. सदर पथक गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी करत असतांना, गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा इसम नामे भागवत निवृत्ती ताके हा त्याचे दोन साथीदारासह केला आहे. त्यावरुन पथकाने व्यवसायिक कौशल्य आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदर इसमाचा शोध घेतला असता ते मिळुन आल्याने त्यांना त्यांचे नांव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नामे 1) भागवत निवृत्ती ताके वय- 32 वर्षे, 2) समाधान शाहुराव मिसाळ वय-37 वर्षे दोघे रा. जेऊर हैबती ता.नेवसा 3) सिध्दांत रमेश डुकरे वय-26 वर्षे रा. चिंचोली फाटा. ता.राहुरी जि. अहिल्यानगर असे सांगितले. त्यांना गुन्हयातील चोरीस गेलेला ट्रॅक्टर व ट्रेलर बाबत विचारपूस केली असता, त्यांने गुन्हा केल्याची कबुली देवून, सदरचा ट्रॅक्टर व ट्रेलर आरोपी भागवत ताके याचे ओळखीचे इसम नामे सुरेश चिमाजी जगदाळे रा. गणेश नगर वडगांव शेरी ता. हवेली जि. पुणे याचे कोन्हाळे ता.अक्कलकोट जि. सोलापुर येथील शेतामध्ये लावले असल्याबाबत सांगितले. त्यानुसार पथकाने सदर ठिकाणी जावुन सदर गुन्हयातील चोरीस गेलाला ट्रॅक्टर व ट्रेलर पंचनामा करुन, एकुण 2,50,000/-रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वरील प्रमाणे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गु. र. नंबर 912/2025, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 (बी) प्रमाणे दाखल गुन्ह्यात ताब्यातील आरोपीस आणि चोरीस गेलेला ट्रॅक्टर व ट्रेलर असा एकुण 2,50,000/- रुपयांचा मुद्देमाल तपासकामी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन, पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा.श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles