Tuesday, November 4, 2025

मराठा पतसंस्थेला चालु आर्थिक वर्षात २० लाखांचा ढोबळ नफा ,पन्नास कोटी ठेवीचे उद्दीष्ट पूर्ण

मराठा पतसंस्थेला चालु आर्थिक वर्षात २० लाखांचा ढोबळ नफा पन्नास कोटी ठेवीचे उद्दीष्ट पूर्ण

मराठा सेवा संघ प्रणित, अहिल्यानगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेचे मार्च अखेर ५० कोटी ठेवीची उद्दिष्ट पुर्ण झाले असुन सन २०२४ २०२५ या आर्थिक वर्षात वर्षात २० लाख ढोबळ नफा झाला असल्याची माहिती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष चेअरमन डॉ. इंजि. विजयकुमार ठुबे यांनी दिली आहे.

मार्च अखेर पतसंस्थेचा एकत्रीत व्यवसाय ८५ कोटी ३९ लाख, खेळते भागभांडवल ५६ कोटी ०३ लाख, स्वनिधी १ कोटी ९० लाख, एकुण ठेवी ५२ कोटी, कर्ज वितरण ३४ कोटी ३९ लाख असुन १९ कोटी १५ लाखाची सुरक्षित गुंतवणुक केलेली आहे.

संस्था समाजातिल होतकरू उद्योजकांना अर्थपुरवठा करून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी मदत करत आहे. संस्थेने आतापर्यंत अनेक उद्योजकांना मोठ्या प्रमाणात अर्थसाहय केलेले असुन समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत आहे.

यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन बाळकृष्ण काळे म्हणाले की, पतसंस्थेने रौप्यमहोत्सवी वर्षात पदापर्ण केलेले असुन त्यानिमित्ताने रौप्यमोहत्सवी ठेव योजना चालु केलेली असुन सदरच्या ठेव योजनेमध्ये २५१ दिवसाला १० टक्के व्याज व पाच ग्रॅम चांदीचे नाणे देण्यात येणार आहे. तसेच रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने सभासदांनी ५० हजार शेअर्स मध्ये गुंतवणुक केल्यास १५ टक्के लाभांश व ५ ग्रॅम चांदीचे नाणे देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. संस्थेच्या मार्केट यार्ड, भिंगार, संगमनेर, पाथर्डी, नेवासा, शेवगांव, कर्जत या ठिकाणी शाखा कार्यरत आहेत.

संस्थेच्या विविध योजनेचा लाभ घेण्याचे अवाहन संचालक लक्ष्मणराव सोनाळे, ज्ञानदेव पांडुळे, किशोर मरकड, राजश्री शितोळे, सतिश इंगळे, प्रा. किसन पायमोडे, यशवंत शिंदे, ॲड काशिनाथ डोंगरे, ज्ञानेश्वर अनभुले, इंजि. संभाजी मते, व्दारकाधिश राजेभोसले, इंजि. बाळासाहेब सोनाळे, प्रा. डॉ. कल्पना ठुबे, ॲड राजेश कावरे, निवृत्ती रोहोकले, सुनिल जाधव मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकड यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles