खा. लंकेंनी बीएसएनएल अधिकाऱ्यांना धरले धारेवर !
विविध सुविधांमधील त्रृटींबाबात विचारला जाब
खा. बजरंग सोनवणे यांचीही उपस्थिती
अहिल्यानगर : प्रतिनिधी
भारत दूरसंचार निगमच्या अधिकाऱ्यांसमवेत बुधवारी अहिल्यानगर येथे पार पडलेल्या बैठकीत खासदार नीलेश लंके यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत विविध सुविधांमधील त्रृटींबाबत जाब विचारला. यावेळी बीएसएनएलच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष खासदार बजरंग सोनवणे हे उपस्थित होते. त्यांनीही अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
बैठकीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याच्या दक्षिण लोकसभा मतदारसंघातील नगर, पारनेर, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगांव, श्रीगोंदे व राहुरी या तालुक्यांतील अनेक गावांमध्ये बीएसएनएल सिग्नल अत्यंत दुर्बल आहेत किंवा संपूर्णतः अनुपलब्ध आहे याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. संबंधित गावांमध्ये बीएसएनएलचे टॉवर तातडीने उभारण्याचे निर्देश देत ग्रामीण भागात बीएसएनएलची दुरसंचार सेवा पोहचविण्यासाठी ठोस योजना तयार करण्याची सुचना खासदार नीलेश लंके यांनी केली. ग्रामीण भागात डिजिटल भारत मिशन यशस्वी करण्यासाठी दर्जेदार सेवा पुरविणे आवष्यक असल्याचे यावेळी खा. लंके यांनी सांगितले.
यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांनी बीड लोकसभा मतदारसंघातील बीएसएनएल सेवांचा आढावा घेत ग्रामीण भागातील संपर्क व इंटरनेट सेवा बळकट करण्यावर भर दिला.
बैठकीस बीएसएनएलचे महाप्रबंधक राजेंद्रसिंह चोंगड, डीजीएम प्लॅनिंग एस.के. पटेल, एमजीएम ओएमसी जी.एस. जोशी, राशिनकर, दीपक जोशी विजय पिंपरकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
विविध मुद्यांचा आढावा
या बैठकीमध्ये बीएसएनएलच्या एफटीटीएच फायबर कनेक्शन, मोबाईल टॉवर्सची स्थिती, कॉपर कनेक्शन व त्यावरील सेवा, नव्या मोबाईल टॉवरची आवष्यकता, प्रीपेड सेवा व कनेक्शनची उपलब्धता, दूरध्वनी केंद्र व त्यांची स्थिती, डिजिटल भारत निधीचा वापर आदी विविध मुद्यांवर चर्चा करण्यात येऊन सखोल आढावा घेण्यात आला.
दूरसंचार मंत्रालयाशी पत्रव्यवहार करणार
आपण संसदेत जाऊन आठ महिने झाले तरी बीएसएनएल कार्यालयाकडून आतापर्यंत खासदार या नात्याने कोणतीही माहीती देण्यात आली नाही. अधिकारी भेटीसाठीही आले नाहीत. लोकप्रतिनिधींसंबंधातील शिष्टाचार न पाळणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याची टीपन्नी करत यासंदर्भात आपण केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाशी


