अजितदादांच्या अपघाताबाबत कशाला बोलताय ? मिटकरींना पक्षातील नेतेच विचारतायत जाब

अजित पवार यांच्या निधनाला आज एक महिना झाला. मात्र कुठल्याच प्रश्नांची उत्तर मिळाली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. अजित पवारांचा अपघात की घातपात याची उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माझा लढा सुरू राहणार, असंही अमोल मिटकरींनी ABP माझाशी बोलताना सांगितले.

रोहित पवारांसोबत मी आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांसोबत मी आहे. कुठल्याही पक्षाचा आमदार आमच्यासोबत असला तर त्यालाही सोबत घेणार, असं अमोल मिटकरी म्हणाले. मला आमच्याच पक्षातले नेते बोलताय, तुम्ही का प्रश्न विचारताय? तुम्ही अजित पवारांच्या अपघातावर का जास्त बोलताय? मला माहिती नाही ते असं का बोलत आहेत. पण मला जे योग्य वाटतं ते मी करतोय, असं अमोल मिटकरींनी यावेळी स्पष्ट केलं.

झ्या पक्षातले काहीजण माझ्यासोबत प्रश्न उपस्थित करतात. आता बाकीचे का प्रश्न उपस्थित करत नाहीत? हे मी सांगू शकत नाही. राजकीय दृष्टिकोनातून जर रोहित पवार आमच्या पक्षाबद्दल बोलत असेल तर मी त्याला उत्तर देणार नाही. मी फक्त अजित पवारांच्या अपघाताबद्दल जर ते प्रश्न विचारत असेल तर त्यांच्यासोबत मी असेल, असंही अमोल मिटकरींनी सांगितले. अधिवेशन सुरू असताना आणि मागच्या महिन्याभरात एक दिवस असा गेला नाही अजित पवारांची आठवण आली नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles