Thursday, February 19, 2026

विखे-पाटील साहेब यांनी केलेलं विधान अत्यंत क्लेशदायक, आश्चर्यकारक आणि बेजबाबदार आहे..

आमदार रोहित पवार यांनी अनेक पत्रकार परिषदा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या आदल्या दिवशीच्या घटना, तसेच विमानातील काही गोष्टी, काही त्रुटी निदर्शनास आणऊन दिल्या, पुरावेही सादर केले. मात्र यावर राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल टीका केली होती. रोहित पवार अपघाताचे राजकारण करत असून लोकांचा बुद्धिभेद करत आहेत, अशा शब्दांत त्यांनी रोहित पवारांवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यांच्या या टीकेवर रोहित पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

विखे पाटील यांनी रोहित पवारांवर बोचरी टीका केली. काही लोक दुःखात आधार देण्याऐवजी लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोण काय म्हणते, याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. हा स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले होते. त्यांच्या याच टीकेवर रोहित पवार यांनी एका पोस्टमधून प्रत्युत्तर दिले.

रोहित पवार यांची पोस्ट ..

” ज्येष्ठ नेते विखे-पाटील साहेब यांनी केलेलं विधान अत्यंत क्लेशदायक, आश्चर्यकारक आणि बेजबाबदार आहे. अजिदादांसारखा दुर्दैवी प्रसंग कधीच कुणाच्याही कुटुंबावर ओढवू नये… वेदना काय असते ती ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अजितदादांच्या अपघाताच्या विषयावर मी राजकारणाचा ‘र’ शब्दही उच्चारला नसताना विखे पाटील साहेब ओढून ताणून या विषयाला राजकारणाशी जोडून विमान अपघाताच्या चौकशीला वेगळं वळण तर देत नाहीत ना? काठावर बसून त्यांना आमच्या दुःखाची धग कळणार नाही, त्यामुळं त्यांनी किमान या विषयाला वेगळे फाटे तरी फोडू नयेत, अशी माझी त्यांना विनंती आहे” असं रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles